Delhi Crime Latest News: देशाची राजधानी दिल्ली दुहेरी हत्याकांडाने हादरली. दक्षिण पूर्व दिल्लीतील लाजपत नगरमध्ये आई आणि मुलाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री धारदार शस्त्राने ही दोघांची हत्या करण्यात आली. घरात काम करणाऱ्या नोकरानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याने हत्येची कबुली दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिलेचा पती घराबाहेर असताना नोकराने घरात घुसून दोघांना संपवले, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव रुचिका (४२), तर मुलाचे नाव कृष (१४) असे आहे. महिलेच्या पतीचे नाव कुलदीप असे आहे.
आई-मुलाची हत्या; काय घडलं?
कुलदीप घराबाहेर होता. ज्यावेळी तो घरी आला, तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. जिन्यातील पायऱ्यांवर रक्ताचे डाग होते. त्यामुळे त्यांनी लगेच पोलिसांना कॉल केला. ९.४० वाजता पोलिसांना कॉल करण्यात आला होता.
वाचा >>वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी दरवाजा तोडला. कुलदीप आणि पोलीस घरात आले. त्यावेळी त्यांना हादराच बसला. महिलेचा मृतदेह बेडरुममध्ये पडलेला होता, तर मुलाचा मृतदेह वॉशरुममध्ये पडलेला होता. पोलिसांनी दोघांचा मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.
नोकराने महिला आणि मुलाची हत्या का केली?
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. दुहेरी हत्या प्रकरणात नोकराचे नाव समोर आले. पोलिसांनी घरकाम करणाऱ्या नोकराला लगेच अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. त्याने दोघांची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेने नोकराला शुल्लक गोष्टीवरून झापले होते. त्याचा त्याला राग आला होता. त्या रागातूनच त्याने महिला आणि मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली.
मुकेश असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. तो कुलदीप यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता आणि कपड्याच्या दुकानातही हेल्पर म्हणून काम करायचा.