वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ येथे दुहेरी हत्याकांड; पती-पत्नीची धारधार शस्त्राने हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 21:08 IST2021-09-19T21:08:06+5:302021-09-19T21:08:28+5:30

Crime case : पती-पत्नीची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली.

Double murder at Chakatirtha in Washim district; Husband and wife killed with sharp weapon! | वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ येथे दुहेरी हत्याकांड; पती-पत्नीची धारधार शस्त्राने हत्या !

वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ येथे दुहेरी हत्याकांड; पती-पत्नीची धारधार शस्त्राने हत्या !

वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चाकातीर्थ येथे पती पत्नीची धारधार शस्त्राने हत्या झाल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गजानन निंबाळकर-देशमुख व निर्मला गजानन देशमुख असे मृतक पती-पत्नीचे नाव आहे. विदर्भची पंढरी म्हणून ओळख असलेल्या डव्हा तीर्थक्षेत्रापासून जवळच असलेल्या चाकातीर्थ येथे विश्वनाथबाबाचे समाधीस्थळ आणि हनुमान मंदिर व राजा बाबाचे समाधी स्थळ आहे. मंदिराची देखभाल डोंगरकिन्ही येथील गजानन निंबाळकर देशमुख (६०) , निर्मला गजानन निंबाळकर देशमुख दाम्पत्य गत वीस वर्षांपासून करीत होते. भक्तिभावाने सेवा देणाऱ्या निंबाळकर दाम्पत्याची शनिवारी रात्री त्यांच्या राहत्या खोलीत पाठीमागुन घरात शिरून अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून श्वान पथकाने मारेकऱ्यांचा डव्हाच्या रस्त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसानी घटनास्थळावरून एक कुऱ्हाड आणि हेडफोन जप्त केले. खुनाचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसासमोर उभे आहे. पुढील तपास ठाणेदार आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Double murder at Chakatirtha in Washim district; Husband and wife killed with sharp weapon!