"जसा रामाने रावणाचा वध केला तसंच मी माझ्या मेहुण्यांना संपवणार"; FB वर थेट दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 12:38 IST2022-10-06T12:34:40+5:302022-10-06T12:38:50+5:30

रामाने रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे मी माझ्या मेहुण्यांना संपवणार असल्याचं थेट फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

domestic dispute threat brother in law jija sala ravan kubkarn vibhishan photo viral bareilly | "जसा रामाने रावणाचा वध केला तसंच मी माझ्या मेहुण्यांना संपवणार"; FB वर थेट दिली धमकी

फोटो - सोशल मीडिया

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या मेहुण्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. यासोबतच त्याने स्वत:ला राम म्हणवून घेत आपल्या मेहुण्यांची तुलना रावण, कुंभकर्ण आणि विभीषणसोबत केली आहे. ज्याप्रकारे रामाने रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे मी माझ्या मेहुण्यांना संपवणार असल्याचं थेट फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. मेहुण्यांनी माझं कुटुंब उद्ध्वस्त केल्याचंही त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेशचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला. त्याचा पत्नीशी दररोज वाद व्हायचा. यामुळे त्रस्त झालेला दिनेशचा मेहुणा विनोद स्वत:च्या बहिणीला आणि तिच्या मुलांना आपल्या घरी घेऊन आला. दिनेश अनेकदा पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीत गेला. मात्र त्याच्या तिन्ही मेहुण्यांनी बहिणीला सासरी पाठवण्यास नकार दिला. दिनेश दिल्लीत सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करतो.

विजयादशमीच्या दिवशी दिनेशने तिन्ही मेहुण्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रावण श्रीरामाची पत्नी माता सीतेला उचलून घेऊन गेला. त्यानंतर रामाने रावणाचा वध केला. त्याचप्रकारे मी माझ्या तिन्ही मेहुण्यांना बंदुकीने मारुन टाकेन, अशी फेसबुक पोस्ट दिनेशने केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

दिनेशने दिलेली धमकी पाहून तिन्ही मेहुण्यांनी दिनेशविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दिनेशने आपल्याला व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवूनही धमकी दिल्याचा दावा त्याचा मेहुणा विनोदने केला. त्यानं फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सऍप मेसेजचा स्क्रीनशॉट पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: domestic dispute threat brother in law jija sala ravan kubkarn vibhishan photo viral bareilly