डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:22 PM2021-09-27T20:22:55+5:302021-09-27T20:24:50+5:30

Dombivli gang-rape case : उदया न्यायालयात हजर करणार

Dombivli gang-rape case: All accused arrested; Two more arrested | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : सर्व आरोपी गजाआड;  आणखीन दोघांना अटक

Next
ठळक मुद्देया दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याने या गुन्हयातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.तब्बल 33 नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली.

डोंबिवली - 15 वर्षीय पिडीत मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 33 जणांवर गुन्हे दाखल आहेत. रविवार्पयत 31 नराधमांना अटक केली होती. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात करण्यात आली तर अजून दोन फरार आरोपींचा शोध सुरू होता. दरम्यान या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याने या गुन्हयातील सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.


तब्बल 33 नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. तक्रार दाखल होताच तत्काळ 23 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर उर्वरीत 12 आरोपींचा शोध सुरू होता. शुक्रवार्पयत सहा जणांना जेरबंद करण्यात आले. तर चार आरोपी फरार होते. चौघांनी मोबाईल स्विच ऑफ ठेवल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधणो पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे आरोपींच्या नातेवाईक आणि मित्रंवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. त्यांच्या माध्यमातून या चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची सुत्रंची माहीती आहे. संबंधित आरोपींना कोळेगाव आणि देसलेपाडा येथून अटक करण्यात आली आहे.  दरम्यान यात आणखीन काही जणांचा सहभाग असल्याची माहीती मिळत असून त्यांचाही शोध सुरू असल्याचे सुत्रंनी सांगितले. परंतू पोलिसांनी सर्व आरोपी अटक केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.  
 

न्यायालयातील सुनावणीकडे लागले लक्ष
नराधमांनी तिला तिच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान यातील काही व्हीडीओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रंची माहीती असताना काही आरोपींकडून ते मोबाईलमधून डिलीट करण्यात आल्याचीही माहीती मिळत आहे. त्यामुळे आरोपींचे मोबाईल डिलीट केलेला परत मिळविण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींना बुधवार्पयत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर सरकारी वकीलांकडून पोलिस कोठडी वाढवून दिली जावी अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तर यातील 19 आरोपींचे वकीलपत्र महिला वकील तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. ते आरोपींच्या बाजूने काय युक्तीवाद करतात हे देखील पाहणो महत्वाचे ठरणार आहे.

पिडीतेला नेले होते घटनास्थळी
व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह, मित्रंनी डोंबिवलीसह बदलापुर, रबाळे, मुरबाड या परिसरात पिडीतेवर सामुहीक बलात्कार केला आहे. दरम्यान पोलिसांकडून पिडीतेला ज्या ठिकाणी बलात्काराचा प्रकार घडला त्याठिकाणी नेण्यात आल्याची माहीतीही सुत्रंनी दिली.

Web Title: Dombivli gang-rape case: All accused arrested; Two more arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app