कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 15:24 IST2019-11-02T15:21:15+5:302019-11-02T15:24:13+5:30

कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला.

For dog girl committed suicide | कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या

कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या

ठळक मुद्देकविताचे वडील कवितावर खूप संतापले. कविता खूप दुखी झाली आणि पंख्याला लटकून गळफास घेत आमहत्या केली.

तामिळनाडू  - तरुणीला तिच्या लाडक्या कुत्र्यापासून दूर केल्याचे दुःख असहाय्य झाले. त्यामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

तमिळनाडूत कोईम्बतुर शहरात कविता ही तरुणी राहत असून ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. तिच्या घराकडे एक पाळीव कुत्रा होता. ठिकठिकाणी सुरू असलेल्य पावसामुळे जोरजोरात विजा कडाडत होत्या. त्यावेळी कविताचा कुत्रा घाबरून भुंकायला लागला. कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला. शेजार्‍यांनी याबाबत कविताच्या वडिलांकडे तक्रार केली.

कविताचे वडील कवितावर खूप संतापले.  कुत्र्याला दूर कुठेतरी सोडण्यास सांगितले. यावर कविता खूप दुखी झाली आणि पंख्याला लटकून गळफास घेत आमहत्या केली. आत्महत्येपूर्वी कविताने चिठ्ठी लिहिली आणि आपल्या लाडक्या कुत्र्याची काळजी घेण्यास  कुटुंबीयांना चिठ्ठीतून सांगितले.

Web Title: For dog girl committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.