शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

SUV मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? गुजरात पोलिसांचा आरटीओला लाजीरवाणा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 2:55 PM

Rape in SUV: एक तरुणी तिच्यावर एका नराधमाने त्याच्या एसयुव्हीमध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन गेली होती. त्याची चौकशी करायची सोडून पोलिसांना विचित्रच प्रश्न पडला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही एसयुव्ही एका बड्या पुढाऱ्याची आहे. भद्र पटेल असे त्याचे नाव असून तो भाजी मंडई महामंडळाचा माजी अध्यक्ष होता. त्याची गुन्ह्याची मोठी पार्श्वभूमी आहे. 

Gujrat Pollice horrible Question on Rape: एखाद्या मुलीसोबत किंवा महिलेवर बलात्कारासारखी घटना घडते आणि त्यावर पोलिसांना (Police) नको नको ते प्रश्न सुचतात. पीडितेला तिच्या यातनांपेक्षा याच गोष्टींचा जास्त त्रास होत असतो. असाच एक प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. पीडितेवर एसयुव्हीमध्ये कसा बलात्कार (Rape in SUV) होऊ शकतो असा प्रश्न गुजरातच्यापोलिसांना पडला आहे. यामुळे त्यांनी याचे उत्तर थेट आरटीओकडूनच मागवले आहे. (Gujrat police ask RTO, is there enough space in SUV Car for Rape on Back seat.)

एक तरुणी तिच्यावर एका नराधमाने त्याच्या एसयुव्हीमध्ये बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन गेली होती. त्याची चौकशी करायची सोडून पोलिसांना विचित्रच प्रश्न पडला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करायची सोडून एसयुव्हीमध्ये बलात्कार करता येतो का याचे उत्तर शोधत आहेत.  स्थानिक गुन्हे शाखेने बडोद्याच्या आरटीओ अधिकाऱ्याला स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयुव्ही) मध्ये बलात्कार करण्याएवढी जागा असते का? असा प्रश्न विचारला आहे. 

याशिवाय पोलिसांनी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमचीदेखील माहिती मागविली आहे. बडोदा आरटीओने सांगितले की, हा या प्रकारचा पहिलाच प्रकार आहे. एखाद्या बलात्काराच्या घटनेत वाहनाची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही एसयुव्ही एका बड्या पुढाऱ्याची आहे. भद्र पटेल असे त्याचे नाव असून तो भाजी मंडई महामंडळाचा माजी अध्यक्ष होता. त्याची गुन्ह्याची मोठी पार्श्वभूमी आहे. 

एखाद्या गुन्ह्यात गाडी वापरली असेल तर सामान्यपणे आरटीओकडे गाडीचे फिटनेस सर्टिफिकेटची माहिती मागितली जाते. अशा प्रकराची माहिती मागण्याचा पहिलाच प्रकार आहे, की गाडीत किती जागा असते. या प्रश्नावर खुद्द आरटीओने नाराजी व्यक्त केली आहे. बलात्कारासारखी घटना मागच्या सीटवर होऊ शकते का असा प्रश्न पोलिसांनी विचारला आहे. यावर त्यांनी पीडितेच्या तक्रारीवरून आपल्याला ही माहिती हवी असल्याचे कारण दिले आहे. तसेच तिच्यावर बलात्कार होत असताना पीडितेने तेथून पळण्याचा प्रयत्न केला का नाही, यासाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टिमची माहिती मागितली आहे. 

काय आहे घटना....पोलिसांमध्ये नोंद झालेल्या तक्रारीनुसार घटना 26-27 एप्रिलच्या रात्रीची आहे. 30 एप्रिलला तक्रार दाखल झाली आहे. दोन मे रोजी आरोपीला अटक करण्यात आली. पटेल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पटेल आणि पीडिता हे एका कॉमन मित्रामुळे एकमेकांना ओळखत होते. पीडिता एका पार्टीला गेली होती. तिला रात्री उशिर झाल्याने तिने तिच्या मित्राला न्यायला येण्यास सांगितले होते. त्या मित्राने पटेलला पाठवून दिले. पटेलने अंधाराचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच धमकी दिली की कोणाकडे तक्रार करू नको.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस