अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:34 AM2018-12-27T06:34:21+5:302018-12-27T06:34:29+5:30

पूर्वेतील एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लि

The doctor who abused a minor girl was arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर अटकेत

Next

 कल्याण : पूर्वेतील एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लिनिकच्या बाजूला असलेल्या औषध दुकानदाराने या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री डॉक्टर ताज अन्सारीला अटककेली असून, दुकानदार दिलदार शेखचा शोध सुरू आहे.
पूर्वेतील सूचकनाका परिसरात डॉक्टर ताज अन्सारी याच्या हसन क्लिनिकमध्ये पीडित मुलगी कामाला आहे. मार्च महिन्यापासून डॉक्टर अन्सारी पीडित मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. डॉक्टरला विरोध केल्यास तो कामावरून काढून टाकेल, या भीतीने ती या प्रकाराकडे दुर्लक्ष करत होती. एक दिवस क्लिनिकमध्ये कोणी नसताना डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला, तर बदनामी करण्याची आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली.
पीडित मुलगी निमूटपणे अत्याचार सहन करत असल्याने डॉक्टरची हिंमत वाढली. क्लिनिकमध्ये कोणी नसताना तो अधूनमधून तिच्यावर अत्याचार करत होता. क्लिनिकच्या बाजूलाच दिलदार शेख याचे औषधांचे दुकान आहे. त्याला या प्रकाराची कुणकुण लागली होती. एक दिवस डॉक्टर आणि पीडित मुलीचा व्हिडीओ दिलदार शेखने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शेखने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करून डॉक्टर अन्सारीला रात्री अटक केली. आरोपी दिलदार शेखचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 

Web Title: The doctor who abused a minor girl was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.