हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नर्सचा केला विनयभंग, आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 14:50 IST2022-05-25T14:49:48+5:302022-05-25T14:50:21+5:30
Doctor molested nurse at hospital : याप्रकरणी नर्सने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.

हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने नर्सचा केला विनयभंग, आरोपी फिजिओथेरपिस्टला अटक
महाराष्ट्रातील अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परवानी रुग्णालयात नर्ससोबत विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फिजिओथेरपिस्ट डॉक्टरने नर्ससोबत अश्लील कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी नर्सने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपी डॉक्टरलाअटक केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच युवासेनेने रुग्णालयात एकच गोंधळ घातला. यासोबतच रुग्णालय चालकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. एवढेच नाही तर आंदोलकांनी रुग्णालयाची तोडफोडही केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलकांना शांत केले. त्याचबरोबर आरोपी डॉक्टरला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
रुग्णालय चालकांनी डॉक्टरला रुग्णालयातून काढून टाकावे, असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील पदवीही काढून फेकून दिली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली. डॉक्टरांवर कारवाई करावी, असे ते म्हणाले. त्याला हॉस्पिटलमधून काढून टाका, अशी मागणी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.