शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात विघ्न! वऱ्हाड्यांनी भरलेली नवरदेवाची गाडी उलटली, 3 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:08 IST

Accident Case : ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक मिरवणुकीत आले होते, ते वराच्या गाडीने काही कामासाठी निघाले होते.

जांजगीर- चंपा : जांजगीर येथील एका कुटुंबात लग्नाच्या आनंदाचे वातावरण असताना अचानक शोककळा पसरली. मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण रस्ता अपघात झाला असून यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. वरातीतील कार अनियंत्रित झाल्याने पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. गाडीतील सर्व लोक लग्नाचे वऱ्हाडी होते, ते काही कामानिमित्त नवरदेवाच्या गाडीने निघाले होते.मस्तुरीच्या पाचपेडी येथून  पकरिय झूलन येथे लग्नाला आलेले सर्वजण वराच्या गाडीने फिरायला गेले होते. सर्वजण दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याची माहिती मिळालेली नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार किमान 2 ते 3 वेळा उलटली. जखमींना बिलासपूर येथे रेफर करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह पामगड सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येत आहेत.या घटनेनंतर पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. जवळचे लोकही मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. या अपघातात जागीच मृत्यू झालेले तीनही तरुण बिलासपूरच्या पाचपेडी भागातील रहिवासी आहेत. सुनील कुमार नायक (34), शिवकुमार नायक (45) आणि संतोष नायक (36) अशी तिघांची नावे आहेत.

 

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू