शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रंगाचा बेरंग, धुळवडीदरम्यान दोन गटात झाला राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 3:47 PM

याप्रकरणी  चतुःशृंगी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देपुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी भागात ही घटना घडली आहे.पुण्यात धुलीवंदनात रंग खेळताना दोन गटात राडा झाला.

पुणे: धुळवडीच्या दिवशी गणेशखिंड रस्त्यावरील खैरेवाडीत युवकांच्या दोन गटात रंग लावण्याच्या कारणावरुन हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली. टोळक्याकडून एका वाहनाची तोडफोड करण्यात आली. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. 

रंग लावण्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाले. त्यानंतर एकमेकांना लाठी-काठ्याने मारहाण करण्यात आली. वसाहतीत धुळवड खेळताना वाद झाल्यानंतर दोन्ही गटातील युवकांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यामुळे परिसरात घबराट  उडाली. वादात एका वाहनाची काच फुटली. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत दोन्ही गटातील युवक घटनास्थळावरुन पसार झाले.

याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, खैरेवाडीत झालेला वाद रंग लावण्याच्या कारणावरुन झाला. त्यामुळे दोन्ही गटातील युवकामध्ये मारामारी झाली.या घटनेनंतर पसार काहीजण पसार झाले. मारामारीत एका वाहनाची काच फुटली. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून मारामारी करणाºयांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.खैरेवाडीतील दोन गटातील मारामारी सीसीटीव्ही कॅमेºयांनी टिपली आहे. चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांकडून पळून गेलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. वादाचे अद्याप ठोस कारण समजले नसले तरी पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती या भागतील नागरिकांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे