शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

UP: वाद पेटला अन् घडले अग्नितांडव, दलित वस्ती दिली पेटवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 14:59 IST

योगी आदित्यनाथांनी आरोपींविरोधात एनएसए लावण्याचे दिले आदेश

ठळक मुद्देमंगळवारी सराईकवाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदेठी गावात दलितांची काही मुले शेळी चारत होती. त्याचवेळी दुसर्‍या समाजातील काही मुले आली. दोन्ही समाजातील मुलांमध्ये वादंग निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्या घरातील थोरांमध्ये देखील भांडणं सुरु झाली.

जौनपूर - उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात मुलांमधील वाद इतका पेटला की काही नराधमांनी अनेक दलितांची घरे जळाली. दलितांच्या वस्तीत त्यांनी खूप नुकसान केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस कारवाई करण्यात आली आणि ३५ जणांना अटक केली. आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेत आरोपींविरूद्ध रासुका  (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याचे आदेश दिले आहेत.मंगळवारी सराईकवाजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भदेठी गावात दलितांची काही मुले शेळी चारत होती. त्याचवेळी दुसर्‍या समाजातील काही मुले आली. दोन्ही समाजातील मुलांमध्ये वादंग निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्या घरातील थोरांमध्ये देखील भांडणं सुरु झाली.रात्री उशिरा लावली आगदोन्ही समाजातील लोकांची बोलणी झाल्यानंतर हे प्रकरण मिटले. रात्री दुसऱ्या समाजातील लोकांनी  दलित कॉलनीत जाऊन कॉलनीला आग लावली. ज्यामुळे अनेक दलितांची घरे भस्मसात झाली. आपले प्राण वाचवण्यासाठी लोक घराबाहेर पडले, परंतु बरेच मुके प्राणी या आगीत जळाले. लोकांच्या संसाराची आगीत राखरांगोळी झाली .

 

35 जणांना अटक, अनेकांचा शोधपोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत ३५ लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इतर आरोपींचा पोलीस  शोध घेण्यात येत आहे. लवकरच अन्य आरोपींना अटक केली जाईल. नूर आलम आणि जावेद सिद्दीकी असे या घटनेतील दोन मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.मुख्यमंत्र्यां आरोपींवर एनएसए आणि गँगस्टर कायदा लागू करण्याचे दिले आदेशमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्याने आरोपींवर गँगस्टर अ‍ॅक्ट आणि एनएसएअंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे स्थानिक एसएचओविरूद्ध दुर्लक्ष करण्याबाबत विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.आर्थिक नुकसान भरपाई जाहीरमुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबांचे नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10,26,450 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबांना 1-1 लाख रुपये समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत 7 पीडित कुटुंबांना घरे देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथArrestअटकPoliceपोलिस