रिक्षा पार्क करण्यावरून वाद पोहोचला शिगेला; बांबूने जीवघेणी मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:33 IST2021-11-28T16:55:01+5:302021-11-28T17:33:55+5:30
Assaulting Case : सर्वेश दिक्षित आणि त्याचा भाऊ हर्ष या दोघांना बांबूने जबर मारहाण आणि शिवीगाळी केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पश्चिमेतील जुनी डोंबिवली साईबाबा मंदिराजवळ घडली.

रिक्षा पार्क करण्यावरून वाद पोहोचला शिगेला; बांबूने जीवघेणी मारहाण
डोंबिवली - रिक्षा पार्क करण्यावरून झालेल्या वादात सोनू उपाध्याय आणि त्याच्या पत्नीने सर्वेश दिक्षित आणि त्याचा भाऊ हर्ष या दोघांना बांबूने जबर मारहाण आणि शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पश्चिमेतील जुनी डोंबिवली साईबाबा मंदिराजवळ घडली. हा मारहाणीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
याबाबतची तक्रार सर्वेशने विष्णुनगर पोलिस ठाण्यात केली असून उपाध्याय पती-पत्नीवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश जाधव हे करीत आहेत. याप्रकरणी आरोपी उपाध्यायला अटक करण्यात आली आहे.