दिशा सालीयन मृत्यूप्रकरण: ‘त्या’ तिघांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 03:05 IST2020-08-27T03:04:57+5:302020-08-27T03:05:41+5:30

दिशाचे वडील सतीश यांनी दिशाची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत एका अभिनेत्यासह दोन यूट्युबरची नावे आहेत.

Disha Saliyan death case: A case has been registered against the three at Malvani police station | दिशा सालीयन मृत्यूप्रकरण: ‘त्या’ तिघांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिशा सालीयन मृत्यूप्रकरण: ‘त्या’ तिघांविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालीयनच्या (२८) मृत्यूनंतर तिची बदनामी करणाऱ्या तिघांवर अखेर मालवणी पोलिसांनी अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिशाचे वडील सतीश यांनी दिशाची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत एका अभिनेत्यासह दोन यूट्युबरची नावे आहेत. दिशाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, अफवा पसरविणारी माहिती या तिघांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा त्यांचा आरोप आहे. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून अखेर एनसी दाखल केल्याचे समजते. तर, दिशाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान मालाड, मालवणीतील रिजंट गॅलेक्सी या राहत्या इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून दिशा खाली कोसळल्यानंतर तिची हत्या केल्याचा दावा काही लोकांनी करीत तिचे नाव अभिनेता सूरज पांचोलीशी जोडले होते. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात सूरजनेही एका अभिनेत्याविरोधात लेखी तक्रार दिली असून, पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Disha Saliyan death case: A case has been registered against the three at Malvani police station