शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

बापलेकीच्या नात्याला काळिमा! बलात्काराच्या प्रयत्नात असलेल्या बापाचा मुलीने काठी डोक्यात घालून केला खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:58 IST

Crime news : ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे.

ठळक मुद्देमुलीने आपली सुटका करून घेत असताना हाताला सापडलेल्या काठीने बापाच्या डोक्यावर प्रहार केला. जोरदार प्रहाराने बाप जमिनीवर पडला आणि खूप रक्तस्त्राव होऊ लागला.

राजस्थानातील जोधपूरमध्ये मुलीनेच स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ही धक्कादायक घटना जोधपूरच्या डांगियावास पोलीस ठाण्याच्या हद्दीती बिरामी गावातील आहे. या मृत नराधम बापास दारुचे व्यसन जडलेले होते.

मद्यधुंद अवस्थेत घरी परतल्यानंतर त्यानं आपल्याच मुलीच्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीने केला आहे. नात्याला काळिमा फासणारा नराधम बाप नेहमीच आपल्या मुलीला मद्यपान करून छळत असे. सोमवारी रात्री त्याने हद्दच पार केली आणि मुलीचे कपडे फाडत तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आपली सुटका करून घेत असताना हाताला सापडलेल्या काठीने बापाच्या डोक्यावर प्रहार केला. जोरदार प्रहाराने बाप जमिनीवर पडला आणि खूप रक्तस्त्राव होऊ लागला.

या घडलेले घटनेने घाबरलेली मुलगी आपल्या आईजवळ जावून झोपली आणि सकाळी उठल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मथुरादास माथूर रूग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपायुक्त धर्मेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वय अंदाजे ४० वर्षे होते आणि त्याला दारुचे खूप व्यसन होते. कुटुंबियांच्या चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, तो भांडणखोर स्वभावाचा होता. त्याचे पत्नीबरोबर नेहमी वाद होत असत. यापूर्वीही त्याने आपल्या मुलीशी गैरवर्तन केले होते. मात्र, घरातील लोकांनी अब्रू जाईल म्हणून याबाबत बाहेर वाच्यता केली नव्हती. याशिवाय त्याने पत्नीला एकदा जाळण्याचाही प्रयत्नही केला होता.

सोमवारी मध्यरात्री या नराधम बापाने हद्द पार करत मुलीचे कपडे फाडत तिच्यावर बळजबरी शोषण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतप्त मुलीने रागाच्या भरात केलेल्या काठीच्या प्रहाराने त्याला जीव गमवावा लागला. 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळDeathमृत्यूRajasthanराजस्थानPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण