भारतात NRI बहिणींची ऑनलाईन फसवणूक; डिजिटल अरेस्ट करत 2 कोटी रुपये लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 14:53 IST2024-12-06T14:51:34+5:302024-12-06T14:53:42+5:30

Digital Arrest : मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगत दोघींना जाळ्यात ओढले.

Digital Arrest : Online Fraud of NRI Sisters In India; 2 crore looted by digital arrest | भारतात NRI बहिणींची ऑनलाईन फसवणूक; डिजिटल अरेस्ट करत 2 कोटी रुपये लुटले

भारतात NRI बहिणींची ऑनलाईन फसवणूक; डिजिटल अरेस्ट करत 2 कोटी रुपये लुटले

Digital Arrest : गेल्या काही काळापासून भारतात डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनौमधून समोर आला आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे सांगून दोन NRI बहिणींना सायबर ठगांनी 1 कोटी 90 लाख रुपयांना लुटले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक कारवाई करत पोलिसांनी 25 लाख रुपये गोठवले. दोन्ही बहिणी कॅनडाच्या असून, भारतात फिरायला आल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी आधी या दोन बहिणींना डिजिटल अरेस्ट केले आणि वेगवेगळ्या मार्गाने धमकावून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लुटले. आरोपींनी आधी दोघींना सावकारी प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. यानंतर त्यांच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांना व्यवहार झाल्याची खोटी माहिती दिली. या आरोपामुळे जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, अशी भीती त्यांना दाखवली. शेवटी त्यांच्या खात्यातून 1.90 कोटी रुपये ट्रान्सफर केले.

दोन्ही बहिणी कॅनडाच्या रहिवासी
सुमन कक्कर आणि विनय थापलियाल अशी डिजिटल फसवणूक झालेल्या या बहिणींची नावे आहेत. या दोघी मूळ भारतीय असलून, कॅनडात वास्तव्यास आहेत. दोघी सध्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. त्या दोघीनी सांगितल्यानुसार, आरोपींनी त्यांना मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवत व्हिडिओ कॉलद्वारे धमकावले होते. त्यामुळे घाबरुन दोघींनी आरोपींना पैसे पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दोघींनी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सायबर क्राईम पथकाने तात्काळ कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि पोलिसांनी प्राथमिक कारवाई करत 25 लाख रुपये गोठवले. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी ही रक्कम चार राज्यांतील अनेक बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याचे या घटनेच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Digital Arrest : Online Fraud of NRI Sisters In India; 2 crore looted by digital arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.