The diamond merchant committed suicide and wrote this in a suicide note | खळबळजनक! हिरे व्यापाऱ्याने केली आत्महत्या अन् सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं

खळबळजनक! हिरे व्यापाऱ्याने केली आत्महत्या अन् सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं

ठळक मुद्देधीरेनभाई चंद्रकांत शहा (६१) हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.तात्कळ शहांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली.

मुंबई - नेपियन्सी रोडवरील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून मंगळवारी सकाळी एका हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा (६१) हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर इमारतीत शहा यांच्या कार्यालयात टेबलावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शहा यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असून तिथे तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो.

ऑपेरा परिसरातील नेपियन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. आज सकाळी ९.३० ते ९. ५० दरम्यान नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर इमारतीत त्यांचे कार्यालय होते. या इमारतीच्या गच्चीवर गेले. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली. तात्कळ शहांचे मृतदेह सर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.

माझ्या नवऱ्याला सोडू नका; छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या, आईला केला मेसेज

 

या अभिनेत्रीने अजय देवगणमुळे आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न, हे होते कारण

English summary :
A 61-year-old diamond merchant committed suicide by jumping off a commercial high-rise at Zaveri Bazaar on Tuesday morning.

Web Title: The diamond merchant committed suicide and wrote this in a suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.