Dont leave my husband Playback singer sends message before suicide | माझ्या नवऱ्याला सोडू नका; छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या, आईला केला मेसेज

माझ्या नवऱ्याला सोडू नका; छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या, आईला केला मेसेज

ठळक मुद्देप्रसिद्ध कन्नड पार्श्वगायिका सुश्मिथा यांची गळफास लावून आत्महत्याआत्महत्येपूर्वी आईला मेसेज पाठवून मांडली व्यथागायिकेच्या आत्महत्येनंतर पती फरार; पोलिसांकडून शोध सुरू

बंगळुरू: मला छळू नको अशी याचना मी त्याच्याकडे वारंवार करायचे. मी त्याला अनेकदा विनंती केली. मात्र त्यानं अजिबात पर्वा केली नाही. मला माझ्या कृत्यांची शिक्षा मिळाली. मला माफ करा. पण त्याला असंच सोडून देऊ नका, असा मेसेज आईला केल्यानंतर प्रसिद्ध कन्नड पार्श्वगायिका सुश्मिथा (वय २६ वर्ष) यांनी आत्महत्या केली. सुश्मिथा यांनी त्यांच्या माहेरी घरी गळफास लावून आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं. 

सुश्मिथा यांच्या आत्महत्येप्रकरणी अन्नपूर्णेश्वरीनगर पोलिसांनी तिचा पती शरथ कुमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शरथ कुमार एका खासगी कंपनीत काम करतो. सुश्मिथा यांच्या आत्महत्येनंतर शरथ कुमार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुश्मिथा यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या मेसेजमध्ये लग्नानंतर सहन कराव्या लागलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. 

'मी याबद्दल कधीही कोणालाच काही सांगितलं नव्हतं. माझा पती मला एक शब्दही बोलू द्यायचा नाही. तो कायम माझ्यावर ओरडायचा. घर सोडून जायला सांगायचा. मला त्याच्या घरात स्वत:ला संपवायचं नव्हतं. मला माझ्या घरात प्राण सोडायचा होता,' अशा शब्दांमध्ये सुश्मिथा यांनी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये आपली व्यथा मांडली. 

'अम्मा, मला तुझी खूप आठवण येते. माझा लहान भाऊ सचिन तुझी काळजी घेईल याची खात्री आहे. आपल्या गावी माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. सचिन माझ्यावर अंत्यसंस्कार करेल,' अशी शेवटची इच्छा सुश्मिथा यांनी आईला पाठवलेल्या मेसेजमध्ये व्यक्त केली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dont leave my husband Playback singer sends message before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.