धारावीत दिव्यांग तरुणीवर वृद्धाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 03:18 IST2019-05-08T03:17:45+5:302019-05-08T03:18:09+5:30

धारावी येथे एका ७७ वर्षीय वृद्धाने दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी मोहम्मद मुझताकीन खान याला अटक केली आहे.

Dharavi Divyang gangrape victim rape | धारावीत दिव्यांग तरुणीवर वृद्धाने केला बलात्कार

धारावीत दिव्यांग तरुणीवर वृद्धाने केला बलात्कार

मुंबई  - धारावी येथे एका ७७ वर्षीय वृद्धाने दिव्यांग तरुणीवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी मोहम्मद मुझताकीन खान याला अटक केली आहे.

तक्रारदार २५ वर्षीय तरुणी धारावी परिसरात मामाच्या घरी राहते. आरोपी खान तिच्या मामाला भेटण्यासाठी घरी येत असे. येताना तो नेहमीच तिच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन येत असे. शनिवारी त्याने तिला मुंबई दर्शन घडवितो, असे सांगत सायन स्थानक परिसरात भेटण्यास बोलावले. तेथून तिला ग्रॅण्ट रोड येथील लॉजमध्ये नेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. पुढे, तिला सायन स्थानकात सोडून निघून गेला.

चुकीची लोकल पकडल्याने तरुणी डोंबिवलीपर्यंत पोहोचली. तेथील रेल्वे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करताच, वरील घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी तिच्या नातेवाइकांना बोलावून घेत, तिला सुखरूप घरी पाठविले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी खानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.या गुन्ह्यात खानला अटक केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dharavi Divyang gangrape victim rape