मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात शुक्रवारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काही लोकांनी चक्क 'फिल्मी स्टाईल'ने एका कंत्राटदाराच्या घरावर इन्कम टॅक्सची खोटी धाड टाकून लाखोंची लूट केली. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचं खोटं सांगून या आरोपींनी घरात प्रवेश केला आणि झडती घेण्याच्या बहाण्याने तब्बल ५० तोळं सोनं, ४ लाख रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 'एमपीईबी' (MPEB) कंत्राटदार राजकुमार मालवीय यांच्या घरी सकाळी ९:४० च्या सुमारास स्कॉर्पिओमधून काही लोक आले. यातील दोन आरोपी खाकी वर्दीत होते, तर इतर तिघे साध्या कपड्यांमध्ये होते. त्यांनी दरवाजा ठोठावून आपण इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याचं सांगितलं आणि काळ्या पैशांची तक्रार आल्याचं सांगत घराची झडती घेणार असल्याचं सांगितलं.
मोबाइलही घेतले ताब्यात
कृष्णा मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी घरात शिरताच कपाट आणि इतर ठिकाणांची झडती घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कपाटाच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या आणि घराच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन तपासणी करू लागले. याच दरम्यान या लोकांनी घरातील सदस्यांना एका खोलीत बसवून त्यांचे मोबाइलही आपल्या ताब्यात घेतले.
१५ मिनिटांत ५० तोळं सोनं घेऊन फरार
१५ मिनिटं घराची झडती घेतल्यानंतर आरोपींनी कपाटातील ५० तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख रुपये आणि मोबाईलसोबत घेतले. त्यानंतर ते तातडीने तेथून पसार झाले. आरोपी गेल्यानंतर हे खरे अधिकारी नसल्याचा संशय कुटुंबीयांना आला. या घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरात नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहेत.
Web Summary : In Madhya Pradesh, imposters posing as income tax officers robbed a contractor's house. They stole 50 tolas of gold, ₹4 lakh, and mobile phones within 15 minutes before fleeing. Police are investigating the brazen daylight robbery.
Web Summary : मध्य प्रदेश में, आयकर अधिकारी बनकर ठगों ने एक ठेकेदार के घर में डकैती डाली। उन्होंने 50 तोला सोना, 4 लाख रुपये और मोबाइल फोन 15 मिनट में चुरा लिए और फरार हो गए। पुलिस मामले की जांच कर रही है।