शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीची शिष्यांची मागणी, आरोपी जाणार हायकोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 22:18 IST

Bhayyu Maharaj Suicide Case:दुसरीकडे आरोपीचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. 

इंदूर - भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर अनेक वेळा या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी भय्यू महाराजांच्या शिष्यांनी सीबीआयला पत्रही लिहिले आहे. सीबीआयने भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास करावा, अशी मागणी भक्तांकडून करण्यात आली आहे. सीबीआयने बारकाईने तपास केला तर भय्यू महाराजांनी आत्महत्या नाही तर त्यांची हत्या झाली होती हे स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांना आहे. तसेच दुसरीकडे आरोपीचे वकील जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. 

भय्यू महाराज यांच्या निधनानंतर उज्जैन येथील त्यांचे शिष्य भारत पोरवाल यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी सीबीआयला एक पत्रही लिहिलं. ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. यावेळी त्यांनी इंदूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही आदर करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायालयासमोर सर्व पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. पण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केला तर अनेक दडलेल्या बाबी स्पष्ट होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

इंदूर जिल्हा न्यायालयाने सेवादार विनायक केअरटेकर पालक आणि सेवादार शरद याला 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आरोपीचे वकील उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील आरोपी सेवादार शरद याची बाजू मांडणारे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी सांगितलं की, महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या सेवादाराने सुद्धा सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मात्र मागणीनंतर लगेचच त्यास या प्रकरणात अटक करण्यात आली आणि आरोपी बनवण्यात आलं. आरोपी सेवेदार शरदची देखील या प्रकरणी सीबीआय तपास व्हावी अशी इच्छा  आहे. त्याचबरोबर या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले आहे.

मध्यप्रदेशातील इंदूर येथील राष्ट्रसंत भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी रिव्हॉल्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाडे, शरद देशमुख, पलक पुराणिक यांना केली अटक असून, ते सध्या कारागृहात आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर कुहू ही प्रसारमाध्यमांपासून दूर होती. वडिलांशी निगडित अनेक गोष्टी तिने न्यायालयाला सांगितल्या. यामध्ये संपत्तीचा वाद, भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, परिवारातील अन्य सदस्यांचे वागणे या गोष्टींचा समावेश होता.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय