सैतान प्रियकर! ३ दिवस घरात कोंडून छळ, स्टीलच्या बाटलीने वार; त्रिपुराच्या लेकीची मृत्यूशी झुंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:13 IST2026-02-24T11:13:02+5:302026-02-24T11:13:41+5:30

पीडित तरुणी गुरुग्राममधील एका नामांकित विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात तिची ओळख एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिवम नावाच्या तरुणाशी झाली होती.

Devil lover! Tortured and locked in house for 3 days, beaten with steel bottle; Tripura girl fights to the death! | सैतान प्रियकर! ३ दिवस घरात कोंडून छळ, स्टीलच्या बाटलीने वार; त्रिपुराच्या लेकीची मृत्यूशी झुंज!

सैतान प्रियकर! ३ दिवस घरात कोंडून छळ, स्टीलच्या बाटलीने वार; त्रिपुराच्या लेकीची मृत्यूशी झुंज!

भविष्यात मोठी इंजिनिअर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून ती ईशान्येकडील त्रिपुरा राज्यातून हजारो किलोमीटर लांब गुरुग्राममध्ये आली होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्याच प्रियकराने तिला तीन दिवस घरात डांबून रानटी प्राण्यापेक्षाही वाईट वागणूक दिली. प्रियकराच्या अमानवीय छळाची ही कहाणी ऐकून आज संपूर्ण देश हादरून गेला आहे. सध्या ही १९ वर्षीय तरुणी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

डेटिंग ॲपवरून सुरुवात झाली अन्... 

पीडित तरुणी गुरुग्राममधील एका नामांकित विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात तिची ओळख एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिवम नावाच्या तरुणाशी झाली. शिवम दिल्लीच्या नरेला भागातील रहिवासी असून तो बेरोजगार होता. संवादाचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघेही गुरुग्राममधील सेक्टर-६९ मधील एका पीजीमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. घरच्यांना त्यांच्या प्रेमाची कल्पना होती, पण आपली मुलगी शिवमसोबत एकत्र राहतेय, हे तिच्या आईला माहीत नव्हतं.

क्रौर्याची सीमा ओलांडली; प्रायव्हेट पार्टला लावली आग!

१६ फेब्रुवारी रोजी अचानक या नात्याला सैतानी वळण मिळालं. शिवमने तरुणीवर चारित्र्याचा संशय घ्यायला सुरुवात केली. या संशयाचं भूत त्याच्या डोक्यात इतकं शिरलं की तो एखाद्या जल्लादाप्रमाणे वागू लागला. त्याने तरुणीला तीन दिवस घरात कोंडून ठेवलं. तिच्या डोक्यात स्टीलची बाटली, मातीचं मडकं घालून वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर टाकून आग लावली. तरुणी वेदनेने विव्हळत असताना हा नराधम तिचा व्हिडिओ बनवत होता. इतकंच नाही तर त्याने तिला अमानवीयपणे लघवी पाजल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

बंगाली भाषेतील तो फोन कॉल अन् सुटका

तीन दिवस मरणयातना सहन केल्यानंतर १९ फेब्रुवारीला तरुणीला संधी मिळाली आणि तिने तात्काळ आपल्या आईला फोन लावला. "आई, मला वाचव! शिवम मला जिवंत मारून टाकेल, त्याने मला जाळलंय," असं ती बंगाली भाषेत ओरडून सांगत होती. आईने वेळ न घालवता त्रिपुरा पोलिसांना कळवलं आणि तिथून गुरुग्राम पोलिसांशी संपर्क साधला गेला. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून जेव्हा त्या फ्लॅटचा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. तरुणी अर्धवट जळलेल्या अवस्थेत जमिनीवर तडफडत होती.

आरोपी जेरबंद, पीडितेची प्रकृती गंभीर

पोलिसांनी तात्काळ शिवम याला घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये या क्रौर्याचा व्हिडिओही सापडला असून, तो सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. पीडित तरुणीवर सध्या दिल्लीत उपचार सुरू आहेत, मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये शिवमवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुग्राम पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : जलनखोर प्रेमी ने गर्लफ्रेंड को प्रताड़ित किया: प्राइवेट पार्ट जलाया, मौत से जंग

Web Summary : गुरुग्राम में एक लिव-इन पार्टनर ने त्रिपुरा की महिला को बेरहमी से प्रताड़ित किया। उसने उसे बंदी बनाकर मारपीट की और उसके प्राइवेट पार्ट को जला दिया। वह दिल्ली के अस्पताल में जिंदगी के लिए जूझ रही है; आरोपी गिरफ्तार।

Web Title : Jealous Boyfriend Tortures Girlfriend: Private Parts Burned, Fights for Life

Web Summary : A Tripura woman was brutally tortured by her live-in partner in Gurugram. He held her captive, assaulted her, and burned her private parts. She's battling for her life in a Delhi hospital; the accused is arrested.