सोलापूरचा उपमहापौर फसवणूक प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात; एकच फ्लॅट नऊ ते दहा जणांना विकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 12:28 PM2020-05-30T12:28:10+5:302020-05-30T12:28:32+5:30

आरोपी हा भाजपाकडून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे.

Deputy mayor of Solapur in police custody in fraud case; A single flat sold to nine to ten people | सोलापूरचा उपमहापौर फसवणूक प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात; एकच फ्लॅट नऊ ते दहा जणांना विकला 

सोलापूरचा उपमहापौर फसवणूक प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात; एकच फ्लॅट नऊ ते दहा जणांना विकला 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी केली सांगवी पोलिसांकडे तक्रार

पिंपरी : एकच फ्लॅट नऊ ते दहा जणांना विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी सोलापूर येथील उपमहापौराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी (दि. २९) पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली.
राजेश काळे असे ताब्यात घेतलेल्या उपमहापौराचे नाव आहे. आरोपी काळे हा भाजपाकडून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळे याने सांगवी येथील एक फ्लॅट नऊ ते दहा जणांना विक्री केला आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खरेदीदारांनी सांगवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गेल्यावर्षी आरोपी काळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास सुरू असताना आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले. एक अधिकारी व दोन कर्मचारी अशा तीन जणांच्या पथकाने आरोपी काळे याला शुक्रवारी सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी करून याप्रकरणी कारवाई करण्यात येणार आहे. सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Deputy mayor of Solapur in police custody in fraud case; A single flat sold to nine to ten people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.