दहशत माजविणारे दोन गुन्हेगार हद्दपार!

By सागर दुबे | Updated: March 3, 2023 19:18 IST2023-03-03T19:18:02+5:302023-03-03T19:18:10+5:30

संदीप आणि विशाल हे दोघं टोळीने राहून जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होते.

Deportation of two criminals who terrorize in jalgaon | दहशत माजविणारे दोन गुन्हेगार हद्दपार!

दहशत माजविणारे दोन गुन्हेगार हद्दपार!

जळगाव : जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणा-या दोन गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून २ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाने झाली असून संदीप भास्कर ठोके (२४),  विशाल वाल्मिक जाधव (२३, दोन्ही रा.गेंदालाल मिल) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

संदीप आणि विशाल हे दोघं टोळीने राहून जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होते. या टोळीची नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. शहरात शांतता ठेवण्याबाबत त्यांच्याविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात येत होती. मात्र, दोघांच्या वर्तनात कुठलीही सुधारणा होत नव्हती.

दोघांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळे ७ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी चौकशी केली. त्यात दोन्ही गुन्हेगारांना वारंवार गुन्हे करण्याच्या सवयी असल्याचे निष्पन्न झाले. अखेर पोलिस अधीक्षक यांनी संदीप व विशाल या गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

Web Title: Deportation of two criminals who terrorize in jalgaon