शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

भाजपा आमदाराकडे मागितली ५ कोटींची खंडणी; मुलाला जीवे मारण्याचीही धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 19:32 IST

Demanding ransom of Rs 5 crore from MLA Prakash Bharasakle : दर्यापूरच्या निवासस्थानी पोहोचले पाकीटबंद पत्र

ठळक मुद्देया ‘लेटर बॉम्ब’मुळे दर्यापूर व अकोट मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे.

दर्यापूर (अमरावती) : अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना पाच कोटींच्या खंडणीची मागणी पाकीटबंद पत्राद्वारे करण्यात आली आहे. ही रक्कम न दिल्यास त्यांच्यासह मुलगा व कुटुंबीयांना संपविण्याची धमकी या कथित खंडणीखोरांनी दिली आहे. आमदारांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी हे पत्र आल्याची तक्रार दर्यापूर पोलिसांत करण्यात आली. या ‘लेटर बॉम्ब’मुळे दर्यापूर व अकोट मतदारसंघात राजकीय खळबळ उडाली आहे.

भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे हे दर्यापूर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष, मुलगा विजय भारसाकळे हे जिनिंग-प्रेसिंगचे संचालक आहेत. त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे पत्र शिवाजीनगर स्थित निवासस्थानी २० फेब्रुवारी रोजी टपालाने प्राप्त झाले. त्याबाबत आमदारांना कळविण्यात आल्यानंतर स्वीय सहायक सुधाकर हातेकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलिसांत तक्रार नोंदविली. भारसाकळे कुटुंबाला सुरक्षा पुरविण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारपासून सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदार प्रकाश भारसाकळे २८ फेब्रुवारी रोजी मुंबईला रवाना झाले. ते एकंदर घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत.

२८ फेब्रुवारीचा अल्टिमेटमखंडणी न दिल्यास आमदारांसह त्यांच्या कुटुंबाला गोळ्या घालून वा अपघात घडवून संपविण्याची भाषा करणारे हे पत्र हिंदी भाषेत आहे. पोलिसांना किंवा अन्य कुणाला याबाबत माहिती दिल्यास नुकसान भोगावे लागेल, असा उल्लेख आहे. सदर पत्रात २८ फेब्रुवारीपर्यंत पाच कोटींची खंडणी म्हणून व्यवस्था करून ठेवण्याची धमकी दिली आहे.४० लोकांची टोळीआमदार भारसाकळे यांना खंडणीची मागणी करणाऱ्या पत्रात, हे पत्र पाठविणारे एकूण ४० लोक असल्याचे नमूद आहे. रक्कम दर्यापूर येथे २८ फेब्रुवारीला मिळायला हवी. त्यानंतर आम्ही बिहारला निघून जाऊ. आमच्यापैकी एकही पकडला गेल्यास नुकसान भोगावे लागेल, असेही त्यात नमूद आहे. चौकशीसाठी हे पत्र दर्यापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सदर प्रकरण तपासात घेतले आहे. तपासाअंती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आमदारांच्या कुटुंबीयांना एका पोलिसाची सुरक्षा देण्यात येईल. भारसाकळे अधिवेशनाहून आल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात येईल. - प्रमेश आत्राम, ठाणेदार, दर्यापूर 

३० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच धमकीचे पत्र प्राप्त झाले. पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. दर्यापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवावा व दोषींवर कारवाई करावी. - प्रकाश भारसाकळे, आमदार, अकोट 

टॅग्स :ExtortionखंडणीMLAआमदारAmravatiअमरावतीBJPभाजपाPoliceपोलिस