पगार काढण्याचा मोबदला मागितला आणि अडकला एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 00:02 IST2019-08-02T00:02:03+5:302019-08-02T00:02:52+5:30
मनपा आय हॉस्पिटलच्या लिपिकास एसीबीने ठोकल्या बेड्या

पगार काढण्याचा मोबदला मागितला आणि अडकला एसीबीच्या जाळ्यात
मुंबई - कामठीपुरा येेेथे मनपा आय हॉस्पिटलच्या लिपिकास एसीबीने 5 हजाराची लाच घेताना बेड्या ठोकल्या आहेत. धोंडीराम शंकरराव बंडगर (40) असं या लिपिकाचे नाव आहे.
आकाश एकनाथ कुदे (28) या तक्रारदाराचे चार महिन्याचे वेतन काढले नव्हते. तो पगार काढलेल्याचा मोबदला म्हणून आरोपी धोंडीरामने तक्रारदारकडे 7000 रुपयाची मागणी करून त्यामधील 5000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली.