दहिसरमध्ये डीलिव्हरी बॉयची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 00:29 IST2021-02-13T00:29:20+5:302021-02-13T00:29:47+5:30
झाडावर चढून घेतला गळफास ; पोलीस तपास सुरू

दहिसरमध्ये डीलिव्हरी बॉयची आत्महत्या
मुंबई : झाडावर चढून गळफास घेत, पस्तीस वर्षांच्या इसमाने आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी दहिसरमध्ये हा प्रकार उघड झाला असून, मयत हा एका खासगी फूड ॲपमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता.
ए.डोशी असे त्याचे नाव हाेेते. पटत नसल्याने गेल्या वर्षभरापासून ते पत्नीपासून वेगळे बोरीवलीत राहत होते. शुक्रवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. ज्यात दहिसर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक व्यक्ती असल्याचे कॉलरने सांगितले. त्यानुसार, एमचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. झाडावर जवळपास १५ फूट उंचीवर डोशी यांचा मृतदेह पोलिसांना गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला कळविले. मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ‘डोशी यांच्या खिशात मोबाइल व खासगी बँकेचे कार्ड आढळले.
भावाचा जबाब नोंदविण्यात आला
मृत्युपूर्वी काेणतीही सुसाइड नोट लिहिलेली नसून, त्यांच्या भावाचा जबाब नोंदविण्यात येत आहे. तणावातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे
प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी पाेलीस अधिक चौकशी करत आहेत.