धक्कादायक! पत्नीशी भांडण झाले, पतीने 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून फेकले, स्वतः उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:40 IST2022-12-17T14:38:39+5:302022-12-17T14:40:04+5:30

दिल्लीतून एक धक्कादायक घटना  समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 3 मजली घराच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारल्याचे समोर आले आहे.

delhifather throws 2 year old son 21 feet down from balcony after quarrel with wife jumps himself | धक्कादायक! पत्नीशी भांडण झाले, पतीने 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून फेकले, स्वतः उडी मारली

धक्कादायक! पत्नीशी भांडण झाले, पतीने 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून फेकले, स्वतः उडी मारली

दिल्लीतून एक धक्कादायक घटना  समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर शुक्रवारी रात्री एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 3 मजली घराच्या बाल्कनीतून खाली फेकून दिले आणि नंतर स्वतः उडी मारल्याचे समोर आले आहे. ही घटना दिल्लीतील कालकाजी परिसरातील आहे. वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मानसिंग आणि त्यांची पत्नी पूजा गेल्या काही महिन्यांपासून वादानंतर वेगळे राहत होते. पूजा सध्या तिच्या दोन मुलांसह कालकाजी येथे आजीच्या घरी राहत होती.

काल रात्री मानसिंग पत्नी आणि मुलांना भेटायला आले असता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात त्याने आपल्या मुलाला बाल्कनीत नेले आणि त्याला 21 खाली फेकले आणि नंतर स्वत: उडी मारली. रुग्णालयात दाखल आरोपीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. मानसिंग दारूच्या नशेत असल्याचा आरोप पूजाच्या आजीने केला आहे. मानसिंगविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले, प्रियकराला बोलावले अन्…

काल राणी झाशी रोडवरील मॉडेल बस्ती येथे असलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावरून एका महिला शिक्षिकेने एका विद्यार्थिनीला खाली फेकले होते.  वर्गाचे दार बंद करून विद्यार्थिनीच्या डोक्यात कात्रीने अनेक वार केले. जखमी विद्यार्थिनीला शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बडा हिंदूराव रुग्णालयात दाखल केले, देशबंधू गुप्ता रोड पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिका गीता देसवाल विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. मुलीला फेकल्यानंतर तिने शाळेच्या प्रभारीलाही जखमी केल्याची माहिती आहे.

Web Title: delhifather throws 2 year old son 21 feet down from balcony after quarrel with wife jumps himself