शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Delhi Violence : ताहिर हुसैनविरोधात गुन्हा दाखल, कधीही होऊ शकते अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 2:50 PM

Delhi Voilence : घर आणि फॅक्टरी केली पोलिसांनी सीलबंद

ठळक मुद्देहुसैनविरोधात दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.आम आदमी पक्षाने नगरसेवक ताहिर हुसैन यांना पक्षातून निलंबित केले आहे. हुसैनच्या घरावर छापा पोलिसांनी टाकला असून दिल्ली फॉरेन्सिक सायन्स लॅबचे पुरावे गोळा करत आहेत.  

नवी दिल्ली - निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याच्यावर दिल्लीच्या करावल नगरमध्ये हिंसाचाराप्रकरणी आरोप आहे. या आरोपानंतर ताहिर हुसैन यांना आम आदमी पक्षाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यावरून निलंबित केले आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच हुसैनविरोधात दयालपूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. हुसैनच्या घरावर छापा पोलिसांनी टाकला असून दिल्ली फॉरेन्सिक सायन्स लॅबचे पुरावे गोळा करत आहेत.  आम आदमी पक्षाने नगरसेवक ताहिर हुसैन यांना पक्षातून निलंबित केले आहे. ताहिरवर हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. तसेच दंगेखोरांना आपलं घर वापरण्यास दिल्याचा ठपका आहे. दबाव वाढल्याने पक्षाने कारवाई केली आणि पोलिसांनी अंकित शर्माच्या हत्येप्रकरणी त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. त्यामुळे ताहिर हुसैनलाही पोलीस आता कधीही अटक करू शकतात.

पोलिसांनी गुन्हा दाखल केलाआम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घराकडून दगडफेक, पेट्रोल बॉम्ब टाकणे आणि डझनभर दंगेखोरांचे फोटो व्हायरल झाल्यावर तेथे खळबळ उडाली. सुरुवातीला आपच्या नेत्याने हे आरोप फेटाळून लावत स्वत: वरील आरोप फेटाळून लावला. परंतु आता पोलिसांनी ताहिर हुसैनविरूद्ध गुन्हा दाखल केलाच, तसेच आपने नगरसेवकाला निलंबितही केले आहे.ताहिर हुसैनची फॅक्टरी केली सीलइंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चा तरुण अधिकारी अंकित शर्मा याच्या वडिलांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी ताहिर हुसैनविरोधात एफआयआर दाखल केला असून खुनाच्या आरोपाखाली भा. दं. वि. कलम 302, 201, 365, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओत दंगेखोरांसोबत दिसणारा ताहिरचा प्रथम कारखाना सीलबंद करण्यात आला, काही तासांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर तपास पूर्ण होईपर्यंत आपकडून प्राथमिक सदस्यावरून निलंबित करण्यात आले.चार मजली इमारत ताब्यात ईशान्य दिल्लीतील हिंसा प्रभावित क्षेत्र खजुरी खास येथील ताहिर हुसैनच्या कारखान्यास पोलिसांनी सील ठोकले आहे. ताहिरची ४ मजली इमारत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खजुरी खास भागात, त्या इमारतीचा प्रत्येक मजल्यावर आक्षेपार्ह साहित्य पोलिसांना सापडले आहे. कोठे पेट्रोल बॉम्ब तर कोठो दगडाचे तुकडे, अनेक अ‍ॅसिड पाउच आणि काही दगड फेकण्यासाठी बनवलेले गोफण आढळून आले आहे.

केजरीवाल म्हणाले, दोषींवर कारवाई झाली पाहिजेताहिर हुसैन यांच्यावरील वाढत्या दबावाचा परिणाम आम आदमी पक्षातही दिसून आला. हिंसाचारात ताहिरचा सहभाग असल्याचे दर्शविणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जर माझ्या पक्षाचा नेता दोषी आढळला तर त्याला शिक्षा करावी. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ावर राजकारण होऊ नये, कठोर कारवाई झाली पाहिजे, असे म्हटले आहे. 

ताहिर यांनी हे आरोप फेटाळून लावलेनिलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले की, अंकितच्या मृत्यूमुळे मला दु: ख झाले आहे. मी अंकितच्या कुटूंबाच्या दुःखात सहभागी आहे. माझ्या घराच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब व दगड कोण फेकत होता हे मला माहिती नाही. माझ्या घराचा गैरवापर करण्यात आला. नंतर पोलिसही तिथे पोहोचले. बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत पोलिसांची उपस्थिती होती, त्यानंतर आता पोलिसांची आवक कमी होत असल्याची माहिती मला मिळाली.

 

Delhi Violence: कोण आहे ताहिर हुसैन?; गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याचा आरोप 

Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसraidधाडAAPआप