दिल्ली: सिक्कीमच्या पोलीस जवानाचा तीन सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:47 IST2022-07-18T17:45:57+5:302022-07-18T17:47:34+5:30
रोहिणीयेथील हैदरपूर प्लँटमवरील ही घटना आहे. हे सर्व जवान याच प्लँटमध्ये तैनात होते.

दिल्ली: सिक्कीमच्या पोलीस जवानाचा तीन सहकाऱ्यांवर गोळीबार; तिघांचाही मृत्यू
राजधानी दिल्लीच्या रोहिणी परिसरात सिक्किमपोलिसांच्या जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.
रोहिणीयेथील हैदरपूर प्लँटमवरील ही घटना आहे. हे सर्व जवान याच प्लँटमध्ये तैनात होते. सोमवारी दुपारी तीन वाजताची ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.
लान्स नायक प्रवीण राय याने हा गोळीबार केला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या जवानांसोबत झालेल्या वादातून त्याने हा गोळीबार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्यात पिंटो नामग्याल भूतिया, धनहांग सुब्बा आणि इंद्र लाल छेत्री यांचा मृत्यू झाला आहे. पिंटो हा आरोपी पोलिसाच्याच बॅचचा जवान होता. तर अन्य दोन जवान हे २०१३ च्या बॅचचे होते. पिंटो आणि इंद्रलाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुब्बा यांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करत असताना मृत्यू झाला.