सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:55 IST2026-03-03T12:50:29+5:302026-03-03T12:55:39+5:30

Delhi Murder: दिल्लीत मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून यमुनेत फेकले.

Delhi Shocker: Man Murdered by Friend for Gold Jewels; Body Chopped and Dumped in Yamuna River | सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्...

सतत अंगावर दागिने घालून फिरायचा कॅन्टीन मालक, पाहून मित्रांची फिरली नजर, घरी बोलावलं अन्...

राजधानी दिल्लीतूनगुन्हेगारीची एक सुन्न करणारी घटना उघडकीस आली. छत्तीसगड सदनमध्ये कॅन्टीन चालवणाऱ्या ४८ वर्षीय अनुप गुप्ता यांची त्यांच्याच एका मित्राने पैसे आणि दागिन्यांच्या लोभापोटी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून ते पिशव्यांमध्ये भरले आणि यमुना नदीत फेकून दिले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव अनुप गुप्ता आहे. मुख्य आरोपी हॅपी ऊर्फ सूरज (वय, २९) याची गुप्ता यांच्याशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. गुप्ता हे कुटुंबापासून वेगळे राहत असून त्यांच्या अंगावर नेहमी सोन्याचे दागिने असायचे, हे हॅपीला माहीत होते. याच दागिन्यांवर हॅपीचा डोळा होता आणि त्याने गुप्ता यांना लुटण्याचा कट रचला.

दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी हॅपीने अनुप गुप्ता यांना पार्टीच्या बहाण्याने मटियाला एक्सटेंशनमधील आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले. तिथे हॅपी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून गुप्ता यांना दोरीने बांधले आणि पैशांसाठी बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान गुप्ता यांनी सांगितले की, त्यांचे दागिने छत्तीसगड सदन येथे पार्क केलेल्या त्यांच्या एसयूव्ही कारमध्ये आहेत. आरोपींनी तातडीने तिथे जाऊन कारच्या चाव्या मिळवल्या आणि दागिने लंपास केले. मात्र, तरीही गुप्ता यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांची हत्या केली.

हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे केले आणि तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून ते गुप्ता यांच्याच एसयूव्हीमधून उत्तर प्रदेशातील वृंदावनजवळ यमुना नदीत फेकून दिले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी गुप्ता यांचा मोबाईल वापरून त्यांच्या कुटुंबाला आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांना खोटे मेसेज पाठवले जेणेकरून ते जिवंत असल्याचा भास निर्माण होईल.

२३ फेब्रुवारी रोजी गुप्ता यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये महत्त्वाचा धागा मिळाला. अनुप गुप्ता मटियाला येथील इमारतीत जाताना दिसले, पण बाहेर येताना दिसले नाहीत. तीच कार नंतर यमुना एक्सप्रेसवेच्या दिशेने जाताना टोल नाक्यावरील कॅमेऱ्यात कैद झाली. कॉल डिटेल्स आणि एनएचएआय टोल डेटाच्या आधारे पोलिसांनी संशयित हॅपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान, हॅपीने आपला गुन्हा कबूल केला आणि या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title : कैंटीन मालिक की गहनों की आदत बनी धोखे और भयानक हत्या का कारण

Web Summary : दिल्ली के कैंटीन मालिक अनुप गुप्ता की गहनों के लालच में एक दोस्त ने हत्या कर दी। हत्यारों ने उसके शरीर के टुकड़े कर नदी में फेंक दिए और फर्जी मैसेज भेजे। पुलिस ने चार को गिरफ्तार किया; एक फरार है।

Web Title : Canteen Owner's Jewelry Habit Leads to Betrayal and Gruesome Murder

Web Summary : Delhi canteen owner Anup Gupta was murdered by a friend for his jewelry. The killers dismembered his body, dumped it in a river, and sent fake texts. Police arrested four; one is at large.