शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

दिल्ली पोलिसांना तबलिगी जमात प्रकरणानंतर आली जाग, गुरुद्वारामधील २०० जणांना काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 6:35 PM

तीन दिवस सुरु असलेल्यानंतर 2361 लोकांना येथून हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील मजनू का टीला गुरुद्वारामध्ये अडकलेल्या 200 लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. दिल्लीतील मजनू का टीलामध्ये शीख समुदायाचे 200 लोक अडकले होते.

नवी दिल्ली - दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. तबलिगी जमातचा मरकजला खाली करण्यात आले. तीन दिवस सुरु असलेल्यानंतर 2361 लोकांना येथून हलविण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील मजनू का टीला गुरुद्वारामध्ये अडकलेल्या 200 लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे. वास्तविक, निजामुद्दीन प्रकरणातील चर्चेनंतर आता दिल्ली पोलिस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत.दिल्लीतील मजनू का टीलामध्ये शीख समुदायाचे 200 लोक अडकले होते. अनेक परदेशी लोकही यात सामील आहेत. दिल्ली पोलीस आणि पंजाब सरकारच्या प्रतिनिधींनी लोकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांना बस भरल्यानंतर नेहरू विहारमधील शाळेत हलविण्यात येत आहे. या शाळेत क्वारंटाईन केंद्र बांधले गेले आहे.यापूर्वी, तीन दिवस चाललेल्या कारवाईनंतर निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या  2361 लोकांना बाहेर काढण्यात आले. यापैकी 617 लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित लोकांना क्वारंटाईन केंद्रावर नेण्यात आले आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली- नोएडामध्येही स्थिती चांगली नाही. दिल्लीतील सरकारी रुग्णालयात डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. हा डॉक्टर दिल्ली राज्य कर्करोग रुग्णालयात कार्यरत होता. येथे सध्या ओपीडी बंद आहे. यापूर्वी मोहल्ला क्लिनिकचे 2 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले.त्याचवेळी गौतम बुद्ध नगरमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. अशा प्रकारे गौतम बुद्ध नगरात कोरोना बाधितांची संख्या 41 झाली आहे. दरम्यान, गाझियाबादमध्ये आरोग्य विभागाने नोएडाच्या सीझफायर कंपनीशी संबंधित असलेल्या सर्व 15 लोकांना वेगवेगळ्या भागात रुग्णालयात क्वारंटाईन करून ठेवले आहे.

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या