दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून मंडपात जाऊन तरूणीवर झाडली गोळी, मग स्वत:लाही संपवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 13:52 IST2021-11-10T13:52:23+5:302021-11-10T13:52:49+5:30

तरूण आणि तरूणी दोघेही नातेवाईक होते. दोघांचंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरलं होतं. मुंडका पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

Delhi : One sided lover shoots girl in mandan then dies by suicide | दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून मंडपात जाऊन तरूणीवर झाडली गोळी, मग स्वत:लाही संपवलं...

दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून मंडपात जाऊन तरूणीवर झाडली गोळी, मग स्वत:लाही संपवलं...

दिल्लीच्या मुंडका भागात तरूणीचं लग्न दुसऱ्या तरूणासोबत लावून दिल्याने एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका तरूणाने घरात घुसून तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. तरूणीच्या पायावर गोळी लागली आहे आणि तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तरूण आणि तरूणी दोघेही नातेवाईक होते. दोघांचंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरलं होतं. मुंडका पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याने स्वत:वर छातीत गोळी झाडून घेतली होती. प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, हे प्रकरण एकतर्फी प्रेमाशी संबंधित आहे. 
तरूणी जखमी, तरूणाचा गेला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साधारण ३.१५ वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. एका व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, या भागात तरूणीवर गोळी झाडून एका तरूणाने स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्याला घरात बंद करून ठेवलंय. त्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरून समजलं की, २१ वर्षीय तरूणी गोळी लागल्याने जखमी झाली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तर तरूणाचा मृत्यू झाला होता. आरोपी तरूण तरूणीच्या काकीचा सख्खा भाऊ आहे. 

मंगळवारी दुपारी तो अचानक तरूणीच्या घरी पोहोचला. त्यावेळी तरूणी तिच्या आईसोबत रूममध्ये होती. तेव्हा आरोपी विक्कीने तिच्यावर गोळी झाडली. आई-मुलगी दोघीही ओरडत रूमबाहेर आल्या. लोक जमा झाले. त्यांनी विक्कीला फटकारलं आणि रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने दुसऱ्या रूममध्ये स्वत:वर गोळी झाडून घेतली.

पोलीस म्हणाले की, विक्कीचं तरूणीवर एकतर्फी प्रेम होतं. तरूणी त्याला नेहमीच इग्नोर करत होती. तरूणीचं लग्न दुसरीकडे फिक्स झाल्याने विक्कीने तिच्या सासरच्या लोकांना खोटे मेसेज पाठवून तिला बदमान केलं. ज्यानंतर तरूणीच्या परिवाराने विक्कीच्या परिवाराकडे तक्रार केली होती. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Delhi : One sided lover shoots girl in mandan then dies by suicide