शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली मेट्रोच्या नव्या मार्गावर ५०० मीटर केबलची चोरी; ४ दिवसांपूर्वीच मोदींनी केलेलं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी ज्या नवीन मेट्रो कॉरिडॉरचे भव्य उद्घाटन केलं होतं, त्याबाबत अवघ्या चार दिवसांतच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या रविवारी ज्या नवीन मेट्रो कॉरिडॉरचे भव्य उद्घाटन केलं होतं, त्याबाबत अवघ्या चार दिवसांतच धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिपाली चौक ते मजलिस पार्क दरम्यान सिग्नलिंग केबलची मोठी चोरी झाल्यामुळे गुरुवारी मेट्रोच्या वेगाला 'ब्रेक' लागला, ज्याचा प्रवाशांना मोठा फटका  बसला.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भलस्वा आणि मजलिस पार्क स्थानकांदरम्यान चोरांनी ५०० मीटर सिग्नलिंग केबल लंपास केली. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गाड्यांचा वेग ताशी २५ किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला होता. मेट्रोचा सामान्य वेग यापेक्षा कितीतरी जास्त असल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला.

DMRC ने स्पष्ट केलं आहे की, प्रवाशांची वर्दळ असताना सिग्नलिंग केबल टाकणं शक्य नाही, कारण यामुळे सेवा पूर्णपणे ठप्प होऊ शकते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुरुस्तीचं काम रात्री हाती घेतलं जाणार आहे.

रविवारी पिंक लाईनवरील मजलिस पार्क ते मौजपूर-बाबरपूर आणि दिपाली चौक ते मजलिस पार्क याचं उद्घाटन झालं होतं. उद्घाटनानंतर चार दिवसांतच झालेली ही चोरी आणि सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींनी प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Metro: Cable Theft on New Line Days After Inauguration

Web Summary : Just four days after its inauguration by PM Modi, a 500-meter cable theft on the Delhi Metro's new corridor disrupted services. The incident, between Bhalswa and Majlis Park, caused delays, with trains limited to 25 kmph. Repairs are planned overnight to minimize passenger inconvenience.
टॅग्स :Metroमेट्रोdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीtheftचोरीThiefचोरCrime Newsगुन्हेगारी