शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

बल्बवरुन भांडण; सासऱ्यानं सुनेचा गळा चिरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 10:53 AM

वाढत्या वीज बिलावरुन झालेला वाद विकोपाला

दिल्ली: सासऱ्यानं सूनेची हत्या केल्याची घटना दिल्लीच्या पहारगंज भागात घडली. वाढलेलं वीज बिल आणि लाईट बल्बवरुन सून आणि सासू-सासऱ्यांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. याच वादातून सासऱ्यानं सुऱ्यानं सुनेचा गळा चिरला. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना हत्येची माहिती दिली. नीरज देवी असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. सोमवारी रात्री नीरज देवी यांनी स्वयंपाक घरातील बल्ब काढला. त्यावरुन त्यांचा सासू, सासऱ्यांशी वाद झाला. यानंतर सासरे भगत राम यांनी सुऱ्यानं नीरज देवी यांचा गळा चिरला. नीरज देवी सतत माझ्याशी आणि माझ्या पत्नीसोबत वाद घालायची, अशी माहिती राम यांनी पोलिसांना दिली. याशिवाय नीरज देवीची पतीशीदेखील वारंवार भांडणं व्हायची, असं रामनं पोलिसांना सांगितलं. सूनेची हत्या केल्यानंतर 65 वर्षांच्या भगत राम यांनी रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्येच पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. नीरज देवी सतत घरातील वीज बिलावरुन वाद घालायची. गेल्या महिन्यात जास्त बिल आल्यानं तिनं घरातील अनेक बल्ब काढले होते, असं राम यांनी पोलिसांनी सांगितलं. तर नीरज देवीच्या कुटुंबीयांनी मुलीचा सासरी छळ होत असल्याचा आरोप केला आहे.  

टॅग्स :Murderखून