Delhi lady used to do extortion in the name of rape and molestation recovering millions by writing a false case | रेप आणि छेडखानीच्या नावावर खंडणी मागत होती महिला, खोटी तक्रार करत लाटले लाखो रूपये!

रेप आणि छेडखानीच्या नावावर खंडणी मागत होती महिला, खोटी तक्रार करत लाटले लाखो रूपये!

रेप आणि छेडखानीच्या नावावर एस्कटॉर्शन म्हणजे खंडणी मागणाऱ्या तीन महिलांना दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलं आहे. खोटी तक्रार देऊन महिला लाखोंची वसूली करत होत्या. हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा ७ एप्रिलला मोतीनगर पोलिसात २५ वर्षीय महिलेने ६१ वर्षीय वयोवृद्धा विरोधात छेडखानी आणि रेपची तक्रार दाखल केली. 

या तक्रारीवर आरोपी दिनेश चंद्रने पोलिसांना सांगितले की, त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत आणि त्यांच्याकडे तक्रारदार महिला लाखो रूपयांची मागणी करत आहे. त्यांनी असंही सांगितलं की, सोनिया आणि पूनम नावाच्या दोन महिला त्यांना केस न करण्याच्या बदल्यात १० लाख रूपयांची रक्कम मागत आहेत. ज्यातील ५ लाख रूपये त्यांना आधीच पोचले आहेत. (हे पण वाचा : धक्कादायक! ...म्हणून १६ वर्षीय नातवाने आजीची केली हत्या, मालिका पाहून बनवला हत्येचा प्लॅन!)

पोलिसांसमोर जेव्हा या महिलांची पोलखोल झाली तेव्हा तिघीही फरार झाल्या आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. आरोपी महिलांनी नंबरही बदलले होते. त्या दिल्लीहून जयपूरला पळून गेल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी तिघींना अटक करण्यासाठी एक टीम पाठवली. 

पोलिसांच्या टीमने जयपूर बस स्टॅंडचे सीसीटीव्ह फुटेज तपासले. १०० पेक्षा जास्त बस ड्रायव्हर आणि कंडक्टरची विचारपूसही केली. पोलिसांनी त्यांचे कॉल डीटेल्स काढले तर एका व्यक्तीचा नंबर मिळाला ज्याच्यासोबत महिला सतत बोलत होत्या. याच नंबरच्या माध्यमातून पोलिसांनी या ३ महिलांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली. (हे पण वाचा : खळबळजनक! पतीने केलं दुसरं लग्न म्हणून पत्नीने महिलेसोबतच थाटला संसार, आता मुलांचा बळी देण्याचा प्लॅन!)

पोलिसांनी टागोर गार्डनमध्ये राहणाऱ्या सोनियाला अटक केली. २८ वर्षीय सोनिया घटस्फोटीत महिला आहे. सोनिया रेपचे खोटे आरोप लावत लोकांना ब्लॅकमेल करत होती. इतकेच नाही तर सोनिया देहविक्रीही करत होती. सोनियाच्या जाळ्यात अनेक लोक फसले आहेत. ब्लॅकमेलिंगमध्ये अडकवण्यासाठी सोनिया तिची बहीण पूनमची मदतही घेत होते. पोलिसांनी सांगितले की, पूनमही देहविक्रीच्या व्यवसायात आहे.

पोलिसांनी मेरठमध्ये राहणाऱ्या किरणलाही अटक केली. किरणही सोनिया आणि पूनमसोबत देहविक्री आणि ब्लॅकमेलिंगच्या धंद्यात सामिल होती. पोलिसांना या महिलांची चौकशी केल्यावर अनेक गोष्टी समजल्या. आता पोलीस पुढील कारवाई करत आहे. 
 

Web Title: Delhi lady used to do extortion in the name of rape and molestation recovering millions by writing a false case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.