Delhi Kanjhawala Case: क्रूरतेचा कळस! माहीत असूनही अंजलीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले, आरोपींची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:46 IST2023-01-08T13:35:28+5:302023-01-08T13:46:23+5:30
Delhi Kanjhawala Case: दिल्लीतील कंझावाला प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.

Delhi Kanjhawala Case: क्रूरतेचा कळस! माहीत असूनही अंजलीला 12 किमीपर्यंत फरफटत नेले, आरोपींची कबुली
Kanjhawala Accident Update:दिल्लीतील कंझावाला प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीपोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत बसलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की, घटनेनंतर काही वेळातच मुलीचा मृतदेह गाडीखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. मृतदेह बाहेर काढताना कुणी पाहिले तर आपण अडकू शकतो, या भीतीने आरोपींनी गाडी थांबवली नाही आणि अंजलीला तशाच अवस्थेत 12 किमी फरफडत नेलं. चालत्या वाहनातून मृतदेह आपोआप बाहेर पडेलल, असे आरोपींना वाटले होते.
म्हणजेच या आरोपींना त्यांच्या गाडीखाली एक मृतदेह अडकला असल्याची चांगलीच कल्पना होती. तरीदेखील त्यांनी पकडले जाऊ या भीतीने कित्येक किलोमीटरपर्यंत मृतदेह ओढत नेला. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. यापूर्वी आरोपींनी पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. गाडीत गाण्याचा मोठा आवाज होता, त्यामुळे अंजलीचा आवाज ऐकू आला नाही, अशी माहिती आरोपींनी दिली होती.
अंकुश खन्नाला जामीन मिळाला
कंझावाला अपघात प्रकरणातील आरोपींचा बचाव करणाऱ्या अंकुश खन्ना याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. महानगर दंडाधिकारी सान्या दलाल यांनी शरणागती पत्करलेल्या खन्नाला जामीन मंजूर केला. त्याच्यावरील आरोप जामीनास पात्र असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपीला 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
काय घटना आहे?
31 डिसेंबर-1 जानेवारी दरम्यान रात्री कंझावालाच्या रस्त्यावर जी घटना घडली, ती ऐकून प्रत्येकाचा थरकाप उडेल. रविवारी रात्री अंजली एका कार्यक्रमातून आपल्या स्कूटीवरून घरी परतत होती. यावेळी तिचा अपघात झाला ती गाडीखाली अडकली. यानंतर आरोपींनी अंजलीला सुमारे 12 किलोमीटर फरफडत नेले. यात अंजलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.