Video: 31 डिसेंबरच्या रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने सांगितली हॉटेल अन् बॉयफ्रेंड वाली कहानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:09 PM2023-01-03T21:09:04+5:302023-01-03T21:21:15+5:30

दिल्लीतील कंझावाला परिसरात 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीला कारने चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे.

Delhi Kanjhawala Accident Video: What really happened with Anjali on the night of December 31? | Video: 31 डिसेंबरच्या रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने सांगितली हॉटेल अन् बॉयफ्रेंड वाली कहानी

Video: 31 डिसेंबरच्या रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने सांगितली हॉटेल अन् बॉयफ्रेंड वाली कहानी

googlenewsNext

नवी दिल्ली: दिल्लीतील कंझावाला इथं 31 डिसेंबरच्या रात्री कारनं चिरडून झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज मंगळवारी शवविच्छेदनानंतर अंजलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, अंजलीच्या मैत्रिणीनं पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली तिची मैत्रिण निधीसोबत आली होती. निधीनं या प्रकरणाशी संबंधित अनेक न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

अंजलीची मैत्रिण निधी हिनं 31 डिसेंबरच्या रात्रीचा सर्व तपशील पोलिसांसमोर मांडला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिची मैत्रीण निधी अंजलीसोबत तिच्या स्कूटीवर गेली होती. मात्र तिला या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, ती (अंजलीची मैत्रीण निधी) खूप घाबरली होती, त्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा ती अंजलीला सोडून पळून गेली.

निधी म्हणाली, "मी तिला (अंजली) फक्त 15 दिवसांपासून ओळखत होते, पण आमची खूप लवकर मैत्री झाली. आम्ही नवीन वर्ष एकत्र साजरे करण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरला तिने मला फोन केला आणि मला घेण्यासाठी सुलतानपुरीत आली. त्यानंतर आम्ही रोहिणीला गेलो. ती मला तिच्या घरी घेऊन गेली, मग आम्ही हॉटेलवर गेलो."

निधीने पुढे सांगितले की, ती आणि अंजली पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमधून निघाले होते. अंजली चिडलेली होती. ती म्हणत होती की जर तिचा प्रियकर तिला भेटला नाही तर ती मरेल. मी तिला स्कूटी थांबायला सांगितली, पण तिनं थांबवली नाही. काही क्षणातच त्यांच्या स्कूटीला एका गाडीला धडक दिली. यावेळी अंजली कारखाली अडकली, ती वेदनेने खूप व्हिवळत होती, पण गाडीतील लोकांनी तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि जाणीवपूर्वक गाडी पळवली.  गाडी थांबली असती तर अंजलीला वाचवता आलं असतं. पण, गाडीत बसलेल्या लोकांनी प्रयत्नही केला नाही. ते अंजलीला कारने ओढत पळून गेले. 

1 जानेवारीला काय झालं?

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणारी 23 वर्षीय अंजली 31 डिसेंबरच्या संध्याकाळी अमन विहारमधील तिच्या घरातून नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी निघाली होती. 1 जानेवारीच्या पहाटे, पोलिसांना माहिती मिळाली की एक राखाडी रंगाची बलेनो एक मृतदेह ओढत आहे. पहाटे 4.11 वाजता जोंटी गावातील हनुमान मंदिराजवळ पोलिसांना मृतदेह आढळून आला. अंजलीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या, कपडे फाटलेले होते आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

 

Web Title: Delhi Kanjhawala Accident Video: What really happened with Anjali on the night of December 31?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.