दिल्ली सरकारचा 'या' रुग्णालयाला दणका, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:45 IST2020-06-06T20:42:12+5:302020-06-06T20:45:08+5:30
राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. दिल्लीत सातत्याने हजारो कोरोना विषाणूच्या रुग्ण सापडत आहेत.

दिल्ली सरकारचा 'या' रुग्णालयाला दणका, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणूच्या संसर्गाला वेग आला आहे. दिल्लीत सातत्याने हजारो कोरोना विषाणूच्या रुग्ण सापडत आहेत. दरम्यान सर गंगाराम रुग्णालयाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर गंगाराम रुग्णालयाविरूद्ध दिल्ली सरकारने एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली सरकारने महामारी रोग कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी सर गंगाराम रुग्णालयात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. कोरोना व्हायरस तपासणीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गंगाराम रुग्णालयात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भा. दं. वि. कलम 188 अंतर्गत सर गंगाराम रुग्णालयाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, रुग्णालयांना आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आणि केवळ आरटी पीसीआर अॅपद्वारे नमुने गोळा करणे बंधनकारक होते. सर गंगाराम यांनी नमुने गोळा करण्यासाठी आरटी पीसीआर वापरला नाही.म्हणून दिल्ली सरकारने रुग्णालयाला दणका देत गुन्हा दाखल केला आहे.
निर्दयी! भूमाफियांनी महिलेला जिवंत जाळले, पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल
Lockdown : लॉकडाऊनमध्ये रुम दिला म्हणून रागाच्या भरात हॉटेलमध्ये फेकला पेट्रोल बॉम्ब
Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड