"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:09 IST2025-07-17T17:01:44+5:302025-07-17T17:09:35+5:30

दिल्लीत कर्ज आणि घरगुती वादामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Delhi: Fed up with wife man end his life before dying he said dont give my son to her | "शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला

"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला

Delhi Crime: दिल्लीत अतुल सुभाष प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आलं आहे. दिल्लीच्या निहाल विहार भागातील एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्याने हे सर्व लाईव्ह व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले. व्हिडीओमध्ये व्यक्ती आत्महत्या करण्याचे कारण सांगत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ती व्यक्ती पंख्याला लटकून गळफास घेताना दिसत आहे. हा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला.

राजधानी दिल्लीत कर्ज आणि घरगुती वादामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी, त्या व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि आत्महत्येचे कारण सांगितले. त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास घेतला. मृत व्यक्तीचे नाव विनोद असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी विनोदचा मृतदेह ताब्यात घेतला  आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. फाशी घेण्यापूर्वी विनोदने व्हिडीओ काढत, 'मी आज मेलो तर माझा मुलाला माझ्या कुटुंबियांकडे द्या. त्याला पत्नीकडे देऊ नका, माझ्या मुलाने माझ्यासारखा त्रास सहन करावा असे मला वाटत नाही. माझ्या पत्नीने मला अनेकदा पोलीस स्टेशनच्या चकरा मारायला लावल्या आहेत,' असं म्हटलं होतं.

व्हिडिओमध्ये विकासने म्हटले की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी असलेले संबंध असल्याने तो दुःखी आहे. "माझी पत्नी तिच्या आई आणि बहिणींसोबत राहते. त्यांचे हिशेब खूप चुकीचे आहेत. ते खर्च कसे भागवतात हे मला माहित नाही. जर मी आज मेलो तर माझ्या मुलाला त्याच्या आईकडे नाही तर माझ्या आईवडिलांकडे आणि बहिणीकडे सोपवावे. माझ्या पत्नीची आई भाड्याने राहते त्यामुळे त्याचे देखभाल नीट होणार नाही. त्यांना पैशाची हाव लागली आहे, मला माझा मुलगा परत मिळाला पाहिजे. मला माझ्या मुलाला माझ्या बायकोकडे पाठवायचे नाही. ही माझी शेवटची इच्छा आहे," असं विनोदने म्हटलं.

"कर्जामुळे माझी पत्नी चार वर्षांच्या मुलाला सोडून शाकिब नावाच्या तरुणासोबत फिरायला लागली आहे. मी खूप कर्जात बुडालो होतो ज्यामुळे घरात भांडणं होतं होती. पण आता मी सर्व कर्ज फेडले असून आता मरत आहे. शाकिबला मीच माझ्या घरी आणले होते. पण त्याचे आणि माझ्या पत्नीचे प्रेमप्रकरण सुरु झालं. मी पत्नीला शाकिबसोबत अनेक वेळा पाहिले गेले होते. तो अनेक सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असून त्याने मलाही अडकवलं आहे," असेही विनोदने आत्महत्येपूर्वी म्हटलं.

दरम्यान, व्हिडिओमध्ये विकासने दारूच्या नशेत पत्नीशी गैरवर्तन केल्याची कबुलीही दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.

Web Title: Delhi: Fed up with wife man end his life before dying he said dont give my son to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.