धक्कादायक! बाईक बाजूला घेण्यावरुन वाद, डिलिव्हरी मॅनचा बेदम मारहाणीत जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 11:27 IST2023-04-24T11:19:10+5:302023-04-24T11:27:01+5:30

राजधानी दिल्ली येथे शनिवारी एक धक्कादायक घटना घडली.

delhi crime news two boys was beaten a delivery man to death | धक्कादायक! बाईक बाजूला घेण्यावरुन वाद, डिलिव्हरी मॅनचा बेदम मारहाणीत जागीच मृत्यू

धक्कादायक! बाईक बाजूला घेण्यावरुन वाद, डिलिव्हरी मॅनचा बेदम मारहाणीत जागीच मृत्यू

ट्राफिकमध्ये वाहन बाजूला घेण्यावरुन अनेकवेळा वाद होत असतात. दिल्लीत अशीच एक वादाची घटना समोर आली आहे. या वादात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.गाडी बाजूला घेण्यावरुन किरकोळ वाद झाला. वादातून एका ३९ वर्षीय डिलिव्हरी मॅनची दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. कॅबमधील दोन मुलांचा बाईकवर जाणाऱ्या डिलिव्हरी मॅनसोबत वाद झाला. या वादाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. यानंतर तरुणांनी डिलिव्हरी मॅनला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

बोंबला! आधी अरेंज मॅरेज, मग चार दिवसात लव्ह मॅरेज, दोन्ही पत्नींना ठेवलं वेगवेगळं; झाला भांडाफोड

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मध्य दिल्लीतील शादीपूर गावातील ही घटना आहे. येथे मनीष आणि गोलू नावाचे दोन तरुण कॅबने जात होते, तेव्हा डिलिव्हरी मॅन पंकज ठाकूर हाही रस्त्यावरून जात होता. यावेळी दोन्ही तरुणांचा डिलिव्हरी मॅन पंकज याच्याशी रस्त्याला साईड देण्यावरून वाद झाला. आधी किरकोळ वाद झाला आणि नंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मनीष आणि गोलू यांनी मिळून पंकजला बेदम मारहाण केली. दोन्ही आरोपींनी डिलिव्हरी मॅनला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. जास्त मारहाणीमुळे पंकजचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित राहणाऱ्यांनी पंकजला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलीस पथकाने या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी मनीष कुमारचे वय १९ वर्षे आणि प्रमोद उर्फ ​​गोलूचे वय २० वर्षे आहे. यावेळी पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीचीही तपासणी केली, यामध्ये आरोपी मृत पंकजला मारहाण करताना दिसत आहेत. 

Web Title: delhi crime news two boys was beaten a delivery man to death