Delhi Crime News: कोर्टात साक्ष दिल्याचा राग; भररस्त्यात तरुणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 13:54 IST2022-10-03T13:53:21+5:302022-10-03T13:54:23+5:30
Delhi Murder News: मनीषच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बिलाल, आलम आणि फैजानला अटक केली आहे.

Delhi Crime News: कोर्टात साक्ष दिल्याचा राग; भररस्त्यात तरुणांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील सुंदर नगरमध्ये शनिवारी सायंकाळी तीन मुस्लिम तरुणांनी चाकूने भोसकून मनीष नावाच्या तरुणीचा निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यात आरोपी मनीषवर एकामागून एक चाकूने वार करताना दिसत आहेत. मनीषचा गुन्हा एवढाच होता की, तो त्याच्याविरोधात झालेल्या गुन्ह्याची साक्ष देत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी मनीषकडून त्याचा मोबाईल हिसकावण्यात आला होता आणि त्यादरम्यान त्याच्यावर चाकूने हल्ला झाला होता. त्याच्या मानेवर आणि पोटावर वार करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी कासिम आणि मोहसीन, या दोन आरोपींना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून कासिम आणि मोहसीनचे कुटुंबीय मनीषवर खटला मागे घेण्यासाठी दबाव आणत होते.
28 सप्टेंबर रोजी मनीषची कोर्टात तारीख होती आणि त्यापूर्वीच या दोन्ही आरोपींचे कुटुंबीय मनीषच्या घरी पोहोचले आणि त्याला केस मागे घेण्याची धमकी देऊ लागले. मनीषने हत्येच्या 3 दिवसांपूर्वी, म्हणजे 28 सप्टेंबर रोजी कोर्टात आपली साक्ष दिली होती. आता मनीषच्या हत्येनंतर पोलिसांनी बिलाल, आलम आणि फैजान या तीन आरोपींना अटक केली आहे. मनीषच्या घरी येऊन धमकावणाऱ्यांचीही ओळख पटवली जात असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.