पती बनला सैतान! उचललं थरकाप उडवणारं पाऊल; कुकर, सिलिंडरनं पत्नीचं डोक चिरडलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:00 IST2022-02-03T15:59:07+5:302022-02-03T16:00:01+5:30
आरोपीने आत्मसमर्पण करताना पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने तिचा खून केला.

पती बनला सैतान! उचललं थरकाप उडवणारं पाऊल; कुकर, सिलिंडरनं पत्नीचं डोक चिरडलं अन् मग...
दिल्लीतील गोविंदपुरी परिसरातून गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक अन् थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका पतीने पत्नीचा खून केला. पतीने पत्नीची अशा पद्धतीने हत्त्या केली, जी ऐकून कुणाचाही थरकाप उडेल. एवढेच नाही, तर या घटनेनंतर आरोपी पतीने हत्येची कबुली देत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी पतीचे नाव आसिफ असे आहे तर पत्नीचे नाव शाहीन खान असे होते.
आरोपीने आत्मसमर्पण करताना पोलिसांना सांगितले की, त्याला त्याच्या पत्नीवर कुणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यामुळेच त्याने तिचा खून केला. त्याचा जबाब पीएस गोविंदपुरी येथे डीडी क्रमांक 14अ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
आधी कुकरनं केला वार, मग सिलिंडरनं चिरडलं डोकं -
आरोपी पतीने पोलिसांना सांगितले की, त्याने सर्वप्रथम पत्नीच्या डोक्यावर कुकरने वार केला. पण तिचा मृत्यू झाला नाही. मग त्याने चाकूने तिच्यावर हल्ला केला, यात तिचा मृत्यू झाला. मग त्याने जवळच असलेल्या सिलिंडरने पत्नीचे डोके चिरडले. यानंतर तो आत्मसमर्पण करण्यासाठी पोलिसांत पोहोचला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.