आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:ही गळफास घेतला; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 11:47 IST2023-06-28T11:46:23+5:302023-06-28T11:47:05+5:30

यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

delhi couple found dead inside their house in narela police investigation | आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:ही गळफास घेतला; कारण...

आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:ही गळफास घेतला; कारण...

नवी दिल्ली : दिल्लीतील नरेला पोलीस स्टेशन हद्दीतील स्वतंत्र नगरमध्ये एका जोडप्याचा घरात मृतदेह आढळून आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. गेल्या तीन दिवसांपासून या दाम्पत्यात भांडण होत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता घरात पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तर पतीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. अशा स्थितीत पतीने आधी पत्नीची हत्या करून नंतर गळफास लावून घेतला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याचबरोबर, पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांना समजले की, मृत पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत भांडण होत होते. दोघांचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती. त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे.

Web Title: delhi couple found dead inside their house in narela police investigation