Delhi Anjali Kanjhawala Case Update: अमित शहांकडे फाईल जाताच, सुत्रे हलली; दिल्लीचे ११ पोलीस अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:56 IST2023-01-13T15:55:48+5:302023-01-13T15:56:12+5:30
दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, रोहिणी जिल्ह्यातील एकूण 11 पोलीस जे पीसीआर आणि कांझावाला मृत्यू प्रकरणावेळी तैनात होते त्यांना सक्षम अधिकाऱ्याने मंजूर केल्यानुसार निलंबित करण्यात आले आहे.

Delhi Anjali Kanjhawala Case Update: अमित शहांकडे फाईल जाताच, सुत्रे हलली; दिल्लीचे ११ पोलीस अधिकारी निलंबित
नववर्षाच्या पहाटेला दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत ज्याने अंजलीचा मृतदेह कारच्या चाकात अडकलेला पाहिलेला त्या तरुणाने पोलिसांना दोनदा जागे करण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस नशेत असल्याने त्यांनी फोनवरूनच तुझ तू काम कर असे सांगत हाकलले होते. आजवर दिल्ली पोलिसांनी या पोलिसांवर काहीच कारवाई केली नव्हती. परंतू देशाचे गृहमंत्री अमित शहांकडे अहवाल जाताच तब्बल १३ दिवसांनी ११ पोलिसांवर कारवाई झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीच्या ११ पोलिसांना सस्पेंड करण्यात आले आहे. यामध्ये दोन वरिष्ठ इन्स्पेक्टर, ४ एएसआय, हेड कॉन्स्टेबल ४ आणि एक कॉन्स्टेबलचा समावेश आहे. याचबरोबर डीसीपींना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, रोहिणी जिल्ह्यातील एकूण 11 पोलीस जे पीसीआर आणि कांझावाला मृत्यू प्रकरणावेळी तैनात होते त्यांना सक्षम अधिकाऱ्याने मंजूर केल्यानुसार निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय गृह मंत्रालयाने डीसीपींना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. डीसीपी हरेंद्र कुमार यांनी या प्रकरणाला हत्येऐवजी अपघात असल्याचे सांगितले होते.