फेसबुकवर अश्लील चित्रे टाकून बोगस प्रोफाईल बनवून बदनामी; पणजीतील घटना
By वासुदेव.पागी | Updated: November 4, 2023 17:18 IST2023-11-04T17:18:42+5:302023-11-04T17:18:53+5:30
पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून संशयिताचा शोध सुरू

फेसबुकवर अश्लील चित्रे टाकून बोगस प्रोफाईल बनवून बदनामी; पणजीतील घटना
वासुदेव पागी, पणजीः फेसबूकवर आपल्या नावाची बोगस प्रोफाईल बनवून त्यावर अश्लील फोटो टाकल्याची आणि आपली बदनामी केल्याची तक्रार एका महिलेने सायबर पोलीस स्थानकात नोंदविली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून संशयिताचा शोध सुरू आहे.
सोशल मिडिया माद्यमांचा वापर करून युवतींची बदनामी करण्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. यापूर्वी असे प्रकार सुरू होते, परंतु पोलीसांच्या कठोर कारवाईमुळे त्यावर आळेबंद बसला होता. परंतु आता पुन्हा अशा विकृतींनी डोके वर काढल्याचे आढळून आले आहे. माने आडनावाने ही प्रोफाईल बनविली आहे. प्रोफाईल बनविणारा आपली ओळख लपवून बदनामी करीत असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. कारण फोटो मॉर्फिंगद्वारे अस्लील पोस्ट बनविण्यात आल्याचेही आढळून आले आहे.
पोलिसांनी प्रोफाईल सध्या काढून टाकली आहे. तसेच हे कारनामे करणाऱयाचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तूर्त हा गुन्हा अज्ञाताच्या नावाने नोंदविण्यात आला आहे.