शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Deepali Chavan Suicide : जामीन मिळताच एम.श्रीनिवास रेड्डींना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 20:37 IST

Deepali Chavan Suicide : आरटीपीसीआर चाचणी अहवाल, महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ मे रोजी रेड्ङींना सशर्त अंतरिम जामीन मंजूर करताच त्यांना कोरोनाने ग्रासले आहे.

अमरावती: हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, यासंदर्भात अमरावती महापालिका प्रशासनाने कारागृहाला कळविले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ११ मे रोजी रेड्ङींना सशर्त अंतरिम जामीन मंजूर करताच त्यांना कोरोनाने ग्रासले आहे. रेड्डींना नेमके कुठे लागण झाली, याबाबत कारागृह प्रशासन शोध घेत आहे. ११ मे रोजी रेड्डी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. या चाचणी अहवालाबाबतची माहिती गुरूवारी महापालिकेने कळविली आहे. अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात १ मे पासून रेड्डी यांचा मुक्काम होता. तात्पुरत्या कारागृहात रेड्डींना आणले तेव्हा त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह होता. मात्र, येथेच अन्य कैद्यांच्या संपर्कात ते आले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ज्या कक्षात रेड्डींना ठेवण्यात आले होते, तेथील अन्य कैद्यांची आरटीपीआर चाचणी केली जाणार आहे. हल्ली अमरावती मध्यवर्ती कारागृहात केवळ एकच कैदी पॉझिटिव्ह असून, येथील  विभागीय हाेमगार्ड कार्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र, १२ मे रोजी रेड्डी जामिनावर सुटताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

११ मे रोजी एम. श्रीनिवास रेड्डी यांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. १३ मे रोजी त्यांना लागण झाल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे. शुक्रवारी चाचणी अहवाल मिळविण्यात येणार आहे. तसे रेडडींना कळविण्यात येईल, - एस. आय. थोरात, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणPoliceपोलिसArrestअटकforest departmentवनविभागCourtन्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या