Deep Sidhu Death News: लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 22:23 IST2022-02-15T22:22:25+5:302022-02-15T22:23:35+5:30
Deep Sidhu Accident News: दीप सिद्धू हा शेतकरी आंदोलनावेळी प्रकाशझोतात आला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा तो प्रमुख आरोपी होता.

Deep Sidhu Death News: लाल किल्ला हिंसाचाराचा आरोपी, पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा रस्ते अपघातात मृत्यू
चंदीगढ : पंजाबी अभिनेता आणि लाल किल्ल्यावरील आंदोलनातील आरोपी दीप सिद्धूचा आज रस्ते अपघातात मृत्यू झाला. खरखौदा सोनीपत जवळ त्याच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये त्याचे दोन मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
करनाल टोलनाक्याजवळ दीप सिद्धू याच्या गाडीची टक्कर एका कंटेनरला झाल्याचे सांगितले जात आहे. दीप हा स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होता. त्याच्यासोबत एक महिला मित्र देखील होती. दीप सिद्धूचा मृतदेह खरखौदा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.
सिद्धू हा शेतकरी आंदोलनावेळी प्रकाशझोतात आला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा तो प्रमुख आरोपी होता.