कुरार येथे बेवारस महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 21:46 IST2019-07-22T21:44:21+5:302019-07-22T21:46:58+5:30
याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुरार येथे बेवारस महिलेचा मृत्यू
मुंबई - कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत सावित्रीबाई फुले नगर येथे १४ जुलै रोजी एक ७० वर्षीय महिला आजारी अवस्थेत पोलिसांना आढळून आली. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशांक परब यांनी या महिलेस उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, १६ जुलै रोजी या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत महिलेचे नाव ताहिरा शेख (७०) असं असून तिच्याबद्दल माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिक माहिती मिळून आली नाही. या महिलेची उंची ५ फूट, वर्ण काळासावळा, केस काळे आणि डाव्या मांडीवर जुन्या ऑपरेशनची खूण आहे. या महिलेच्या नातेवाईकांबाबत माहिती मिळून आल्यास त्यांनी कुरार पोलीस ठाण्यात कळवावी असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक शशांक परब यांनी केले आहे.