पतीने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, परळी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:21 IST2018-07-04T17:19:38+5:302018-07-04T17:21:19+5:30

क्षुल्लक कारणावरून पतीने रागाच्या भरात पत्नीस बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कौठळी तांड्यावर मंगळवारी रात्री घडली.

The death of a wife in a rage, and the incident in Parli | पतीने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, परळी येथील घटना 

पतीने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, परळी येथील घटना 

परळी (बीड) : क्षुल्लक कारणावरून पतीने रागाच्या भरात पत्नीस बेदम मारहाण केली. यात बेशुद्ध पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कौठळी तांड्यावर मंगळवारी रात्री घडली. सुनिता दिलीप चव्हाण (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मंगळवारी रात्री सुनिता आणि दिलीप चव्हाण यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद टोकाला गेल्याने दिलीपने रागाच्या भरात सुनीताला मारहाण केली. यात ती बेशुद्ध पडली. यानंतर दिलीपने तिला परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दिलीपला ताब्यात घेतले आहे. 

Web Title: The death of a wife in a rage, and the incident in Parli