शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सहा आरोपींची फाशीची शिक्षा चक्क नऊ वर्षांनी घेतली मागे! सुप्रीम कोर्टाने चूक सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 06:17 IST

नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे.

- अजित गोगटेमुंबई  - नाशिकजवळच्या बेलटगवाण शिवारात घडलेल्या सशस्त्र दरोडा, खून व सामूहिक बलात्काराच्या खटल्यात सहा आरोपींना फाशी सुनावताना चूक झाल्याची कबुली देत सर्वोच्च न्यायालयाने नऊ वर्षांनी आपला निकाल मागे घेतला आहे. आता आरोपींच्या अपिलांवर नव्याने सुनावणी होणार असून, त्याचा निर्णय होईपर्यंत त्यांना फाशी देण्यास स्थगिती दिली आहे.या निर्णयाने अंकुश शिंदे, राज्या शिंदे, अंबादास शिंदे, राजूू शिंदे, बापू शिंदे व सुऱ्या शिंदे यांचा फास तूर्त सैल झाला आहे. हा आदेश न्या. अरिजित पसायत व न्या. मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपीठाने ३० एप्रिल २००९ रोजी दिला. याविरुद्धच्या फेरविचार याचिकाही फेटाळण्यात आल्या. पुढे एका प्रकरणात घटनापीठाने निकाल दिला की, या शिक्षेविरुद्ध फेरविचार याचिकांवर खुल्या कोर्टात सुनावणी घ्यावी. चेंबरमध्ये फेटाळलेल्या याचिकांमधील अशा आरोपींचीही खुली सुनावणी व्हावी.यानुसार आरोपींच्या फेरविचार याचिकांची सुनावणी न्या. कुरियन जोसेफ, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने घेऊन सर्व आरोपींना फाशीचा निकाल मागे घेतला.आधीच्या खंडपीठाकडून तीन आरोपींचा पसंतीचा वकील नेमून बाजू मांडण्याचा हक्क हिरावला गेला होता, हे लक्षात आल्याने चूक सुधारण्यात आली. आरोपींसाठी टी. हरीश कुमार, राहुल कौशिक व गीता कोविलन यांनी तर राज्य सरकारतर्फे निशांत कटनेश्वरकर, सुवर्णा, अनुप कंडराज व दीपा कुलकर्णी यांनी बाजू मांडली.नाशिक सत्र न्यायालयाने सर्वांना १२ जून २००६ रोजी फाशी ठोठावली. उच्च न्यायालयाने २२ मार्च २००७ रोजी अपिलात अंकुश, राज्या व राजू यांंची फाशी कायम केली व इतरांना जन्मठेप दिली. फाशी झालेल्यांनी अपिले केली व इतर तिघांनाही फाशी व्हावी यासाठी राज्य सरकारने अपिले केली.सरकारच्या अपिलांची नोटीस अंकुश, राज्या व राजू या आरोपींवर बजावली गेली. मात्र न्या. पसायत व न्या. शर्मा यांच्या खंडपीठाने दोन दिवस सुनावणी आधी घेतली. नोटीस काढूनही तिघांसाठी कोणीच हजर न राहिल्याने खंडपीठाने अन्य तिघांचे अ‍ॅड. सुशील करंजकर यांनाच त्यांच्या वतीनेही युक्तिवाद करण्यास सांगितले. सर्व अपिले संबंधित व तथ्येही सारखीच असल्याने फाशीचा निकाल तीन नव्हे, तर सर्व आरोपींसाठी आताच्या खंडपीठाने मागे घेतला आहे.घातला दरोडा; बलात्कार व हत्याही केलीबेलटगवाण (ता. नाशिक) शिवारातील रघुनाथ हगवणे यांची बाग त्र्यंबक सतोटे कसत होते. ते बागेतील घरात राहायचे. आरोपींनी ५ जून २००३ ला घरावर दरोडा टाकला. चीजवस्तू लुटण्याखेरीज त्यांनी त्र्यंबक, त्यांचे दोन मुलगे संदीप व श्रीकांत आणि पाहुणा भारत मोरे यांचे खून केले. त्यांनी त्र्यंबक यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून ठार मारले. दरोड्यात त्र्यंबक यांची पत्नी व एक मुलगाही जखमी झाले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी